You are currently viewing छत्रपती शिवाजी चौक मित्रमंडळ, मठ तर्फे गाव मर्यादीत किल्ले बनवणे व प्रदर्शनाचे आयोजन…

छत्रपती शिवाजी चौक मित्रमंडळ, मठ तर्फे गाव मर्यादीत किल्ले बनवणे व प्रदर्शनाचे आयोजन…

छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला दिला उजाळा

वेंगुर्ला
मठ गावामधील शैक्षणिक, सामाजिक उपक्रमाद्वारे नेहमी कार्य करत विद्यार्थी व पालकांनाही सतत प्रोत्साहित करून त्यांच्या सर्वांगिण विकासात नेहमी भर घालत यशस्वीतेसह गुणवत्ता विकास आपल्या विविध उपक्रमांद्वारे करणारे छत्रपती शिवाजी चौक मित्रमंडळ, मठ द्वारे मठ गाव मर्यादीत किल्ले बनवणे व प्रदर्शनाचे आयोजन दीपावलीमध्ये करण्यात आले.

यामध्ये गावामधील मठ बोवलेकरवाडी मित्रमंडळ, मठ गावठणवाडी मित्रमंडळ व संत लालाजी मित्रमंडळ मठ या मंडळांनी शिवरायांचे किल्ले बनवून किल्ले प्रदर्शनात भाग घेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला उजाळा दिला. किल्ल्यांची माहिती देत हिंदवी स्वराज्यातील किल्ल्यांचे महत्त्व स्पष्ट केले. किल्ले प्रदर्शन स्पर्धेत सहभागी मित्रमंडळांचे छत्रपती शिवाजी चौक मित्रमंडळ मठ तर्फे मंडळाच्या वतीने सन्मानचिन्ह देत अभिनंदन करत शुभेच्छा देण्यात आल्या. परीक्षकांच्या उपस्थितीत परीक्षण करण्यात आले.

स्पर्धेत यशस्वी बनलेल्या मित्रमडळांचे मंडळाच्या वतीने सन्मानपुर्वक अभिनंदन करण्यात येणार आहे. किल्ले प्रदर्शन पाहणी व सन्मानचिन्ह देताना श्री. निलेश नाईक ( उपसरपंच मठ ), विरेंद्र सावंत, हरिहर शेणई, दादा गावडे, प्रताप बोवलेकर, संजय बोवलेकर, प्रशांत बोवलेकर, मनाली कामत, सचिन आईर, सुयोग जोशी, रघुनाथ ( आना ) बोवलेकर, किशोर पोतदार तसेच सहभागी सर्व सदस्य, पालक उपस्थित होते. सदर स्पर्धेत आवश्यक तेथे मार्गदर्शक म्हणून सुभाष ठाकूर ( तलाठी ), नितीन मांजरेकर, चंद्रकांत सावंत सर ( जागतिक आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त तथा पदवीधर शिक्षक मठ नं. २) तसेच सदस्य यांनी कार्य केले.छत्रपती शिवाजी चौक मित्रमंडळ, मठ यांच्या सर्वांगिण यशस्वी कार्याचे अभिनंदन करत मंडळाच्या यशस्वी कार्यास सर्वांकडून शुभेच्छा देण्यात आल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three + 4 =