You are currently viewing सोबत

सोबत

सोबत

तिची सोबत असताना,
दिवस कधीच संपतो.
पण…
तिच्यापासून दूर जावं,
असं कधी वाटतंच नाही.

तिची सोबत असताना,
मन तिच्यातच गुंतून राहतं.
पण…
माझ्या मनाला सोडवावसं,
असं कधी वाटतंच नाही.

तिची सोबत असताना,
माझं भावविश्व बदलतं.
पण…
त्या विश्वातून बाहेर यावं,
असं कधी वाटतंच नाही.

तिची सोबत असताना,
मी माझाच राहत नाही.
पण…
मला मी माझा बनावं,
असं कधी वाटतंच नाही.

तिची सोबत असताना…..

(दीपी)
दीपक पटेकर
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा

9 − 3 =