You are currently viewing चिंताग्रस्त

चिंताग्रस्त

किती हा हाहाकार,
निद्रिस्त शासन
देशव्यापी ते
दुःख जना
कितीक
होई
रे

भले भले ते गेले
अश्रूही आटले
शुष्क ते डोळे
दोष कुणी
कोणास
द्यावा
रे

हतबल मानव
सामोरी दानव
नसे दया त्या
माणसाची
नियम
तोडी
रे

अजूनी वेळ आहे
आवरा स्वतःला
नको परीक्षा
संकटाची
जीवन
प्रिय
ते

(दिपी)✒️
दीपक पटेकर, सावंतवाडी
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा

9 − four =