You are currently viewing नाते आपले

नाते आपले

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री वर्षा भावे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

🌹 *नाते आपले*🌹

 

🤝 असा हात-हातात नेहमीच असावा !🤝

कधी हात तुझ्या हातातून न सुटावा!!🌹

 

नेहमीच तू माझ्या संगतीत वसावा🤝

कधी तू माझ्या नयनात दिसावा 🌹

 

तुझ्या दुःखात माझं दुःख असावं!🤝

तुझ्या सुखात माझं सुख असावं!!🌹

 

कधी माझ्या व तुझ्यात न यावा दुरावा!🤝

असा मला साथ तू नेहमीच द्यावा!!🌹

 

जसे आकाशात चन्द्र-तारे असावे!🤝

तसेच नाते आपले नेहमी असावे 🌹

 

जसे दुधात पाणी मिसळून जावे!🤝

तसेच आपण मिळून रहावे!!

 

भाव माझ्या मनीचा तू ओळखून घ्यावा !🤝

उरी अंतरी तू माझ्या नेहमीच रहावा!!🌹

 

जन्मो जन्मातरी तू माझाच रहावा !🤝

माझ्या जीवात तुझा जीव असावा !!🌹

 

विसर माझा तुला कधी न व्हावा 🤝

खर-या अर्थाने मी तुझी व तू माझा असावा🌹

 

माझ्या रंगात तू तुझ्या रंगात मी रंगून जावे 🤝

इन्द्रधनुषा परी आपले रंग असावे 🌹

 

आपल्या मधे कधी कोणीच न यावे !🤝

प्रेम,निष्ठा,विश्वास नेहमीच रहावे !!🌹

🌹🤝🌹🤝🌹🤝🌹

*स्वरचित*

*वर्षा भावे*

*जबलपुर मध्य प्रदेश*

🙏🙏🙏🙏🙏🙏

प्रतिक्रिया व्यक्त करा