You are currently viewing रुग्णसेवा देणाऱ्या जांभवडे पंचक्रोशीतील वाहन चालकाना मास्क, सॅनिटाझर, हॅन्ड ग्लोजचे वाटप

रुग्णसेवा देणाऱ्या जांभवडे पंचक्रोशीतील वाहन चालकाना मास्क, सॅनिटाझर, हॅन्ड ग्लोजचे वाटप

कणकवली

वैद्यकीय उपचारासाठी रुग्णांना ने – आण करण्याची तत्परतेने सेवा देणाऱ्या जांभवडे पंचक्रोशीतील सर्व रिक्षा ट्रॅक्स , मॅजिक, टेम्पो, ट्रॅक चालकांना कोविड कोविड१९ मित्र ग्रुप तर्फेदोन मास्क आणि हॅंड सॅनिटाझर तसेच हॅंड ग्लोव्हज चे वाटप करण्यात आले. एस टी बसेस बंद असल्याने रुग्ण सेवा देण्याचा भार या मंडळींवर पडत आहे. त्यांना संरक्षण मिळावे यासाठी त्यांना या वस्तूंचे वाटप करण्यात आले.

विनय पिळणकर, मंगेश सावंत यांच्या १९९८/९९ या दहावीच्या बॅच मधील माजी विद्यार्थ्यांनी सदर सामान या ग्रुप कडे वाटप करण्यासाठी सुपूर्द करण्यात आले होते. दिलीप कदम यांनी या कामाची गरज यावेळी विशद केली.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर डॉ प्रशांत मडव यांनी रुग्ण नेताना रिक्षा चालकांनी कोणती काळजी घ्यावी , मास्क चे महत्व विशद केले. रेडकर गुरुजी यांनी आवश्यक त्या सुविधा देण्यासाठी आपण या ग्रुप च्या वतीने कटिबध्द असल्याचे सांगितले. पाच गावातील सरपंच, ग्राम पंचायत सदस्य, कर्मचारी, दूध सोसायटी कर्मचारी, सदस्य , अंगणवाडी सेविका, आशा सेविका, नर्सेस यांना पण मास्क आणि हॅंड सॅनिटाझर यांचे वाटप यावेळी करण्यात आले.

यावेळी प्राथमिक शिक्षक खांडेकर , तसेच रिक्षा चालक शाहू कदम, अभी कदम, लवु गुरव , संजय पवार, दीपक मोऱ्ये, डेव्हिड इत्यादी चालक मंडळी , तसेच बाळा कुडाळकर , अमित मडव उपस्थित होते.
रिक्षा चालक भगवान शिंदे यांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.

बाबा परेरा या चालकाचा कोविड रुग्णांची वाहतूक करण्यास मदतीचा हाथ दिल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
कोविड 19 मित्र ग्रुप तर्फे असे उपक्रम चालू ठेऊन मदतीचा हाथ देवू असे वामन तर्फे, शिवाजी मडव यांनी सांगितले.
विनय पिळणकर , मंगेश सावंत आणि ९८/९९ दहावी बॅच चे आभार रिक्षा चालकांच्या वतीने शाहू कदम यांनी मांडले. आणि आम्ही काळजी घेवून रुग्ण सेवा चालू ठेवू असे मत व्यक्त केले.दोन मास्क आणि हॅंड सॅनिटाझर तसेच हॅंड ग्लोव्हज चे वाटप करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 + four =