You are currently viewing वाफोली भर वस्तीत शिरले मगरीचे पिल्लू

वाफोली भर वस्तीत शिरले मगरीचे पिल्लू

बांदा

वाफोली कुडेरा नवाडी येथे भर वस्तीत रोहित कलंगुटकर यांच्या घरा शेजारी मगरीचे पिल्लू दिसले. घरापासून जवळच असलेल्या नदीत मोठ्या प्रमाणात मगरींचे वास्तव असल्यामुळे पुन्हा मगरी वस्तीत येऊ शकतात. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्या पिल्लाला पकडून रोहित कलंगुटकर यांनी नदीत सोडले. वनविभागाने मगरिंचा बंदोबस्त करावा अशी तेथील स्थानिक नागरिकांची मागणी आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eleven − six =