You are currently viewing सलग दुसऱ्यांदा,भाजपा आध्यात्मिक आघाडी तर्फे ठाण्यातील विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी बालसंस्कार रामकथा संपन्न

सलग दुसऱ्यांदा,भाजपा आध्यात्मिक आघाडी तर्फे ठाण्यातील विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी बालसंस्कार रामकथा संपन्न

*सलग दुसऱ्यांदा,भाजपा आध्यात्मिक आघाडी तर्फे ठाण्यातील विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी बालसंस्कार रामकथा संपन्न.*

ठाणे :

येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येमध्ये, रामजन्मभूमीवर बांधलेल्या मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि ह्याच पाश्र्वभूमीवर *भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या* वतीने, ठाण्यातील ब्राह्मण विद्यालयात बुधवार, दिनांक २० डिसेंबर २०२३ रोजी बालसंस्कार राम कथेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यालयातील सभागृहात सर्व विद्यार्थी बाळगोपाळांना, *भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या* सदस्यांनी प्रभू श्रीरामाचे बाल, कुमार वयातील जीवनचरित्र कथन करून सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांसमवेत संस्थेच्या मुख्याध्यापक मॅडम, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

या कार्यक्रमाची सुरवात रामनामाच्या जयघोषात झाली, मग मुलांकडून ओमकार करून घेण्यात आला, त्यानंतर भगवान श्री राम आणि त्यांचे गुरु ह्यांचे नाते आणि प्रभू श्रीराम ह्यांचे जीवन आदर्श ह्यावरील तीन-चार लघुकथा सांगितल्या गेल्या.यामध्ये श्रीराम चरित्रावरील गीतांचाही समावेश होता. मुलांकडून सामूहिक रामरक्षा पठणही करून घेण्यात आले. याप्रसंगी मुलांना राममंदिराचा आत्तापर्यंतच्या इतिहासावरील व्हिडिओ क्लिप दाखवण्यात आली. कार्यक्रमाच्या शेवटी मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले.ह्या कार्यक्रमात *५ वी ते १० वीच्या ५०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.*

हा कार्यक्रम *भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या ठाणे शहर संयोजिका सौ.अश्विनीताई पटवर्धन*, सहसंयोजिका सौ.अलकनंदाताई जोशी, इतर सदस्य सई देव,देविका वळंजू, शशांक देव, आमोद पटवर्धन ह्या सर्वांनी मिळून घेतला.

रामाचे विद्यर्थी वयातील चरित्र मुलांना कळावे आणि आत्ता जे राम मंदिर अयोध्येत उभे राहिले आहे, त्यामागे किती वर्षांचा खडतर संघर्षआहे, किती लोकांनी ह्यासाठी आपले आयुष्य वेचले आहे हे मुलांना कळावे तसेच हे मंदिर आता पुढे त्यांना जपायचे आहे ह्याची जाणीव मुलांना करून द्यावी ह्यासाठी ह्या कार्यक्रमाचे आयोजन आम्ही केले होते. असे भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या ठाणे शहर संयोजिका सौ.अश्विनीताई पटवर्धन ह्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ह्याप्रसंगी त्यांनी हा कार्यक्रम शाळेत घेण्यासाठी परवानगी दिल्याबद्दल ब्राह्मण विद्यालयाचे विश्वस्त श्री.केदारजी जोशी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.वर्षाताई हरदास मॅडम तसेच शाळेचे सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानले. ही सर्व माहिती भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रसिद्धी प्रमुख पत्रकार रुपेश पवार यांनी दिली आहे.

भाजपा आध्यात्मिक
समन्वय आघाडी
99 30 85 21 65

संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा