जिल्हा रुग्णालय झालेय कोरोनाचे प्रसारक : परशुराम उपरकर

जिल्हा रुग्णालय झालेय कोरोनाचे प्रसारक : परशुराम उपरकर

स्वच्छता नसल्याने रूग्णांची होतेय मोठी गैरसोय…

कणकवली :

जिल्हा रूग्णालयात कोरोनावर उपचार घेणारे ७० टक्के रूग्ण बाहेरचे जेवण घेतात. त्यामुळे बाहेरच्या व्यक्तींचा रूग्णालयात मुक्त संचार आहे. याखेरीज रूग्णालयात पुरेशी स्वच्छता राखली जात नसल्याने हे जिल्हा रुग्णालय कोरोनाचे प्रसारक झाल्याचा आरोप मनसे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला आहे.

श्री.उपरकर म्हणाले, जिल्हा रुग्णालय हे कोविड रुग्णालय म्हणून वापरले जात आहे. मात्र येथे रूग्णांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. काल (ता.११) तब्बल १० तास पाणी नव्हते. याखेरीज पूर्वी उपचार घेऊन गेलेल्या रुग्णाच्या चादर, उशा तशाच ठेवून तेथे आलेल्या दुसर्‍या रुग्णाला ठेवले जाते. तसेच जिल्हा शल्य चिकित्सक स्टाफची कोणतीही काळजी घेत नाहीत. रुग्णांचे नातेवाईक, चहा, जेवण देणारे सुरक्षितता न बाळगता कोविड सेंटरमध्ये जा ये करत आहेत. यामुळे कोरोना संसर्गाचा धोका आणखीच वाढत आहे.

श्री.उपरकर म्हणाले, जिल्हा रुग्णालयातील या गैरसोयीबाबत सुजाता शेलटकर यांनी याबाबत आपल्याकडे म्हणणे मांडले आहे. त्यानुसार शुक्रवारी रूग्णालयात तब्बल १० तास पाणी नव्हते. अशास्थितीत अंघोळ व इतर स्वच्छतेची कामे कशी होणार? मृत झालेल्या एका रूग्णाची बेडशीट न बदलता तेथे दुसर्‍या रुग्णाला झोपविण्यात आले. याबाबींमुळे कोरोनाचा संसर्ग आणखीनच वाढत आहे. दरम्यान कोविड सेंटरमध्ये गरम पाण्याची बॉटल १५ रुपयाने घ्यावी लागत आहे. ऑक्सिजनचा पुरवठा करणार्‍या सिलेंडरची वाहतूक नर्सेसना आणि नातेवाइकांना करावी लागत आहे. ऑक्सिजन संपला तर लक्षात येत नाही आणि लक्षात आल्यानंतर पळापळ केली जाते. कॅन्टीनमधील जेवण योग्य नसल्याने ७० टक्के लोक बाहेरच्या खानावळीतून जेवण मागवतात. कँटीन व खानावळीतून जेवण घेऊन येणारे सुरक्षिततेच्या उपाययोजना न करता वॉर्डात फिरतात. पुन्हा ते आपल्या कँटीनमध्ये जाऊन इतरांनाही नाश्तापाणी देत असल्याने संसर्गाचा धोका वाढण्याची शक्यता आहे.

श्री.उपरकर म्हणाले, जिल्हा रुग्णालयाच्या वार्डमधील अनेकांना ताप, खोकला नाही. मात्र, वॉर्ड फुल्ल करून ठेवलेला आहे. स्टाफ बघत नसल्याने नातेवाईक आत जातात. यामुळे संसर्ग वाढत आहे. अ‍ॅडमिट असलेल्या स्टाफला डिस्चार्ज देताना दुसर्‍यांदा स्वॅब घेतला जात नाही. फक्त डॉक्टरांचाच घेतला जातो. यात एका डॉक्टरचा पुन्हा घेतलेला स्वॅब देखील पॉझिटिव्ह आला होता

प्रतिक्रिया व्यक्त करा