You are currently viewing विलवडे गावचे सुपुत्र सुभाष दळवी यांचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

विलवडे गावचे सुपुत्र सुभाष दळवी यांचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

ओटवणे / प्रतिनिधी :

मुंबई महानगर पालिकेच्या घन कचरा व्यवस्थापन विभागाचे विशेष कार्य अधिकारी तथा विलवडे गावचे सुपुत्र सुभाष दळवी यांना कॅलिफोर्निया पब्लिक युनिव्हर्सिटी (युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका) कडून पर्यावरण संरक्षणासाठी शाश्वत घनकचरा व्यवस्थापनात या विषयात मानद डॉक्टरेट (डी. लिट) ही मानाची पदवी प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या.

मुंबई महानगरपालिकेत ही मानाची पदवी प्राप्त करणारे सुभाष दळवी हे एकमेव अधिकारी आहेत. मुंबईतील सह्याद्री गेस्ट हाऊस येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी डिलीट ही मानाची पदवी प्राप्त झाल्याबद्दल सुभाष दळवी यांचे कौतुक करून पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.

यावेळी मंत्री महोदय यांनी मुंबईतील को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी मध्ये कचरा वर्गीकरण आणि ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती या नियोजित प्रकल्पाबाबत चर्चा केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा