You are currently viewing धोकादायक खड्डा श्रमदानाने बुजविला 

धोकादायक खड्डा श्रमदानाने बुजविला 

पाडलोस माडाचेगावळ ग्रामस्थांचे कार्य ; रस्ता निर्धोक करण्याची मागणी..

बांदा

पाडलोस माडाचे गावळ येथील रस्ता वाहतुकीस पूर्णतः धोकादायक बनला आहे. नुकत्याच झालेल्या चक्रीवादळामुळे पाण्याचा प्रवाह जास्त होऊन रस्त्यावर तीन ते चार फूट खोल मोठाले भगदाड पडले होते. तात्पुरत्या स्वरुपात ग्रामस्थांनी सदर धोकादायक खड्डा श्रमदानातून बुजवत रस्त्यावर आलेली झाडे झुडपे तोडून रस्ता निर्धोक केला. त्यामुळे ग्रामस्थांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच प्रशासनाने याकडे लक्ष देऊन रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर भविष्यात उद्भवणार धोका लक्षात घेऊन माडाचे गावळ येथील ग्रामस्थांनी रस्ता निर्धोक करण्याचा निर्धार केला. सर्वांच्या सहकार्याने सुमारे तीन ते चार फूट धोकादायक असलेला खड्डा माती व दगडाच्या साह्याने तात्पुरत्या स्वरुपात वाडीतील तरुणांपासून जेष्ठापर्यंत सर्वांनी एकत्र येऊन श्रमदानातून खड्डा बुजविला. परंतु पावसाळ्यात खड्डा पुन्हा पडण्याची शक्यता आहे. आजारी व्यक्तीला किंवा मालवाहतूक करणाऱ्या गाड्यांना ये जा करणे धोक्याचेच आहे. त्यामुळे धोका अजुनही टळला नसल्याने प्रशासनाने याची दखल घेऊन सदर खड्डा पूर्णपणे काँक्रीट करून बुजवावा तसेच संपूर्ण रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करून येथील ग्रामस्थांना ये-जा करण्यासाठी सोयीचा रस्ता करावा अशी मागणी होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

14 − eight =