You are currently viewing विविध कृषि पुरस्कारांसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन…

विविध कृषि पुरस्कारांसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन…

सिंधुदुर्गनगरी

राज्यात दरवर्षी शेती व पुरक क्षेत्रात अति उल्लेखनिय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यास किंवा संस्थेस कृषि विभागामार्फत शेती क्षेत्राशई संबंधीत विविध पुरस्कार देण्यात येतात. सदर पुरस्कारांसाठी दिनांक 30 जून 2021 रोजी पर्यंत परिपूर्ण प्रस्ताव कृषि विभागाच्या नजीकच्या कार्यालयात सादर करावेत असे आवाहन कृषि विभागातर्फे करण्यात आले आहे.

                सदर पुरस्कारांची माहिती पुढील प्रमाणे आहेत. त्यामध्ये अनुक्रमे पुरस्काराचे नाव, संख्या व पुरस्काराची रक्कम दिले आहेत. डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार, राज्यातून एक, रक्कम रुपये 75 हजार, वसंतराव नाईक कृषिभुषण पुरस्कार, प्रत्येक कृषि विभागात एक याप्रमाणे एकूण 8, रक्कम रुपये 50 हजार, जिजामाता कृषिभुषण पुरस्कार, प्रत्येक कृषि विभागात एक याप्रमाणे एकूण 8, रक्कम रुपये 50 हजार, कृषिभुषण ( सेंद्रीय शेती) पुरस्कार, प्रत्येक कृषि विभागात एक याप्रमाणे एकूण 8, रक्कम रुपये 50 हजार, युवा शेतकरी पुरस्कार, प्रत्येक कृषि विभागात एक याप्रमाणे एकूण 8, रक्कम रुपये 30 हजार, वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार, प्रत्येक कृषि विभागात एक याप्रमाणे एकूण 8, रक्कम रुपये 30 हजार, उद्यान पंडीत पुरस्कार, प्रत्येक कृषि विभागात एक याप्रमाणे एकूण 8, रक्कम रुपये 25 हजार, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार, सर्वसाधारण गटासाठी प्रति जिल्हा 1 याप्रमाणे 34 व आदिवासी गटासाठी प्रति विभाग 1 याप्रमाणे 6 असे एकूण 40, रक्कम रुपये 11 हजार, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि सेवारत्न पुरस्कार, आठ कृषि विभागातून प्रत्येक 1 अधिकारी, कर्मचारी, या प्रमाणे 8, तसेच कृषि आयुक्तालय स्तरावरून एक अधिकारी, कर्मचारी या प्रमाणे एकूण 9.

                या पुरस्कारांच्या मार्गदर्शक सूचना कृषि विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी ग्राम पातळीवर कृषि सहाय्यक, कृषि पर्यावेक्षक, तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करावेत अशे आवाहन कृषि विभागातर्फे करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

8 + twelve =