You are currently viewing भाजपा आमदार नितेश राणे यांनी पाळला युतीचा धर्म

भाजपा आमदार नितेश राणे यांनी पाळला युतीचा धर्म

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला फोंडाघाट,हरकुळ बुद्रुक गावच्या सरपंच पदाच्या जागा सोडल्या

जाणवली, तळेरे, फोंडाघाट,हरकुळ, अशा अनेक ठिकाणी बिनविरोध दिले ग्रामपंचायत सदस्य

कणकवली

राज्यात भारतीय जनता पार्टी समवेत बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) पक्षाची महाराष्ट्रात असलेली युती भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या पुढाकाराने ग्रामपंचायत निवडणुकीत सुद्धा कायम राहिली आहे. युतीचा धर्म पाळत आमदार नितेश राणे यांनी आपल्या मतदारसंघातील बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला सरपंच पदा पासून ग्रामपंचायत सदस्य पर्यंत अनेक जागा सोडल्या तर काही जागा बिनविरोध करून निवडूनही आणल्या आहेत. फोंडाघाट व हरकुळ बुद्रुक ग्रामपंचायत वर भारतीय जनता पार्टीचे सरपंच पदाचे उमेदवार मागे घेत शिंदे गटाच्या संजना संजय आग्रे व अनिल खोचरे यांना युतीचा उमेदवार म्हणून पूर्ण पाठींबा दिला आहे.भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्या या युतीमुळे आमदार नितेश राणे यांनी युती धर्म पाळून प्रगल्भता दाखवून दिली आहे.
फोंडाघाट ग्रामपंचायतच्या निवडणुकीत बाळासाहेबांची शिवसेना पक्ष सोबत युती करून ग्रामपंचायतीचे एकूण पाच उमेदवार युतीचे म्हणून बिनविरोध निवडून सुद्धा आणले आहेत.यात जयेश गणपत भोगले, प्रीतम प्रकाश भोगले, राजश्री राजन नान, अनिकेत लवू पारकर, मयुरी विठोबा येंडे यांचा समावेश आहे.या ग्रामपंचायतीत भाजप शिंदे गट युती विरुद्ध ठाकरे गट महा विकास आघाडी अशी लढत होणार असून भाजप सोबतच्या युतीमुळे शिंदे गटाचे पाढे जड झाले आहे. त्यामुळे बहुमताने युतीची सत्ता स्थापन होणार आहे हे निर्विवाद सत्य आहे.
हरकुळ बुद्रुक ग्रामपंचायतच्या सरपंच पदाच्या उमेदवारास बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे अनिल कोचरे हे भाजप सोबत युती झाल्यामुळे युतीचे म्हणून ठाकरे सेने विरुद्ध लढत देणार आहेत. हरकुल मध्ये सुद्धा युतीचे पारढे जड झालेले आहे. याच सोबत जाणवलीत दामू सावंत हे बाळासाहेबांच्या शिवसेनेचे उमेदवार युतीचे म्हणून देण्यात आलेले आहे. तळेरे येथे सौ वायंगणकर या सुरुवातीलाच बाळासाहेबांची शिवसेनेच्या उमेदवार म्हणून भाजपची युती असल्यामुळे बिनविरोध दिलेल्या आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा