You are currently viewing महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या बीसीए महाविद्यालयामधील विद्यार्थिनींची Wipro व ICICI बँकेमध्ये निवड

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या बीसीए महाविद्यालयामधील विद्यार्थिनींची Wipro व ICICI बँकेमध्ये निवड

रत्नागिरी

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या कॉलेज ऑफ कॉम्प्युटर अॅप्लीकेशन्स फॉर वुमेन (बीसीए) शिरगांव, रत्नागिरी येथील टी.वाय. बीसीए च्या विद्यार्थिनीसाठी मागील बारा वर्षापासून कॅम्पस प्लेसमेंट अंतर्गत विप्रो, इन्फोसिस, कॉग्नीझंट, टीसीएस, ॲटॉस, पटनी व Deloitte इ. बहुराष्ट्रीय कंपनींच्या इंटरव्हयूवचे आयोजन करण्यात येते.
Wipro तर्फे घेण्यात आलेल्या Aptitude Test व इंटरव्हयू मार्फत घेतले गेलेल्या परिक्षेतून टी.वाय.बी.सी.ए च्या कु. सानिका सावंत, कु. सुरभी बापट, कु. झोया काझी यांची विप्रोसाठी work Integrated Learning Programme अंतर्गत Scholar Trainee म्हणून यशस्वी निवड झाली आहे.
त्याचप्रमाणे ICICI बँकमध्ये कु. पल्लवी पाटील, कु. सलोनी वरेकर, कु. श्रेया जाधव, कु. तेजश्री आठवले, कु. इशा मांडवकर, कु. असरा काझी, कु. मैथिली चव्हाण, कु. वैष्णवी घाग, कु. दिव्या सुवरे, कु. पायल काटकर यांची Relationship Manager म्हणून निवड झाली आहे.

या विद्यार्थिनींना बीसीए महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या कु. स्नेहा कोतवडेकर, ट्रेनिंग व प्लेसमेंट ऑफीसर स.प्रा. केतन पाथरे व सर्व प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.

विद्यार्थिनींनी मिळविलेल्या यशाबद्दल रत्नागिरी प्रकल्पाचे प्रकल्प प्रमुख मा. श्री. मंदार सांवतदेसाई तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

ट्रेनिंग अॅड प्लेसमेंट विभागातर्फे विद्यार्थिनींना विविध क्षेत्रातील नोकरीच्या संधी त्यासाठी लागणारी पात्रता, नोकरी मिळविण्यासाठी आवश्यक असलेली बौध्दीक, तांत्रिक कौशल्य, संभाषण कौशल्ये यावर नियमितपणे मार्गदर्शन केले जाते.

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल🔹 खोबरे तेल*
*🔹 तीळ तेल🔹 करडई तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात लिंक*

———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 + eight =