You are currently viewing स्वामी विवेकानंद पतसंस्थेला “बँको” पुरस्कार जाहीर…

स्वामी विवेकानंद पतसंस्थेला “बँको” पुरस्कार जाहीर…

बांदा

आजरा येथील स्वामी विवेकानंद पतसंस्थेला सन २०२१-२०२२ सालाचा बँको पतसंस्था पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. अविज पब्लिकेशन, कोल्हापूर व गॅलेक्सी इनमा, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. १५० ते २०० कोटीच्या ठेवी विभागातून महाराष्ट्र राज्यातून संस्थेची निवड करण्यात आली आहे. १५ मार्च रोजी महाबळेश्वर जि. सातारा येथे पुरस्कार प्रदान कार्यक्रम होणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष जनार्दन टोपले यांनी सांगितले आहे.

राज्यातील सहकार चळवळ बळकट करणा-या पतसंस्थांना हा पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. हा पुरस्कार सहकार क्षेत्रात प्रतिष्ठेचा समजला जातो. स्वामी विवेकानंद पतसंस्थेला यापूर्वी २०१३-१४ चा नचिकेत प्रकाशन नागपूर यांचा “सर्वोत्तम पतसंस्था पुरस्कार”, सन २०१४-१५ सालाचा “सर्वोत्तम सेवा कार्य पुरस्कार”, सन २०१६ सालाचा “बँको पुरस्कार” आजरा तालुका “आदर्श पतसंस्था पुरस्कार” २०१८ – २०१९ “आदर्श व्यवस्थापक पुरस्कार” २०१९ संस्थेस यापूर्वी सन्मानित केले आहे.

संस्थेचा आतापर्यन्त चढता आलेख प्रमाणे प्रगतीची घोडदौड सुरु असून ३१ जानेवारी २०२३ अखेर संस्थेचे वसुल भाग भांडवल ३ कोटी ५८ लाख रुपयाचे असून निधी १० कोटी ६७ लाख रुपयांचा आहे. संस्थेकडे १७० कोटी ठेवी, १३० कोटी कर्ज वाटप केले आहे. ६० कोटी संस्थेची गुंतवणूक आहे. सभासद संख्या १५ हजारांच्या वर आहे. संस्थेने ३०० कोटी एकूण व्यवसाय केला आहे. ऑडीट वर्ग सातत्याने “अ” वर्ग आहे. संस्थेच्या प्रधान कार्यालयासह भादवण, पेरणोली (ता. आजरा ) बांदा, सावंतवाडी, वेंगुर्ला (जि. सिंधुदूर्ग ) डिलाई रोड, मुंबई, आझाद चौक, कोल्हापूर व कसबा गेट कोल्हापूर येथे शाखा आहेत व स्वमालकीच्या इमारती आहेत असून सर्व शाखा या संगणीकृत आहेत.

संस्था ‘चालू वर्ष सुवर्ण महोत्सवी वर्ष २०२२-२०२३ साजरे करीत असून सुवर्ण महोत्सवी वर्षात अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी करिअर ” मार्गदर्शन” अंतरराष्ट्रीय महिला दिना निमित्त महिला मेळावा आयोजित करणेत आला आहे. संस्थेने सुवर्णमहोत्सवी वर्ष निमित्त आजरा शहरात उभारलेल्या श्री लक्ष्मीदेवीचे जागेत आजरेकरांसाठी अतिशय उपयुक्त असा हा उद्यान प्रकल्प उभारण्यात आले असे अनेक सामाजिक उपक्रम संस्थेने राबवलेले आहेत.

पुरस्कार कामी संस्थेचे संस्थापक हरी शंकरशेठ नार्वेकर, मार्गदर्शक महादेव केशव टोपले (बापू) उपाध्यक्ष दयानंद भुसारी, संचालक नारायण सावंत, मलिककुमार बुरुड, रविंद्र दामले, रामचंद्र पाटील. महेश नार्वेकर, सुधीर कुंभार, सुरेश कुंभार, संजय घंटे, राजेंद्र चंदनवाले, प्रेमा सुतार, माधवी कारेकर सरव्यवस्थापक अर्जुन कुंभार व कर्मचा-यांचे सहकार्य लाभल्याचे टोपले यांनी सांगितले पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे पदाधिकारी व कर्मचा-यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 1 =