You are currently viewing कालचा कोकण लयच जबरदस्त!!

कालचा कोकण लयच जबरदस्त!!

फक्त येणाऱ्याक काळीज व्हया… येवा कोकण आपलाच आसा म्हणत काल पुऱ्या रस्तोनरस्ती पानांचे तुक्षे टाकून कच्च हिरवीगार मखमल निसर्गान पेरल्यान. प्रत्येकाच्या खळ्यागनिक आंबे, काजू, फणस, रतांबे अशा फळांचो सडो घालून रांगोळी काढल्यान. रस्त्याच्या दुशे बाजून झाडाच्या झाडा लटकवन अशी काय तोरणा बांधल्यान की बास रे बास! समुद्रात जो काय नाच मांडलेल्यानं तो बघून गोमुची आठवण काढुची हिंमत नाय. वाऱ्याचो बेंजो जबराट, नाशिक बाजा गेलो तेल लायत! ह्यो तडतडाट नी झिनझिनाट!! आजतागायत कोकणातले लॉक काळीज खोलून स्वागत करीत, पण कालच्या वादळात? घरादाराची नी मांगराची छपरा खोलून निसर्गान खुल्या दिलाचा स्वागत कसा आसता ता दाखवल्यान. पुरो कोकण फुल्ल एसी! बुड टेकवशात थय निसता थंडगार……

“येवा कोकण आपलाच आसा” असा पर्यटन घोषवाक्य आयकलात काय धावतास मा कोकणात? वायज निसर्गाच्या हाकेक ओ देवन येवा आता कोकणात!!

बघया काळीज तुमचा!!

*©️अवि’ज उंगले*

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − thirteen =