You are currently viewing कणकवली तालुक्‍यात वादळी वाऱ्याने घरांची छपरे उडाली

कणकवली तालुक्‍यात वादळी वाऱ्याने घरांची छपरे उडाली

कणकवली

अरबी समुद्रात दाखल झालेल्या तोक्ते चक्रीवादळामुळे कणकवली तालुक्यात शनिवारी रात्रीपासूनच सोसाट्याच्या वादळी वाऱ्यामुळे तालुक्यातील काही घरांची छप्पर उडून जात नुकसान झाले. तर काही घरांवर झाडे व झाडांच्या फांद्या पडल्याने या घर व इमारतीचे नुकसान झाले. कणकवलीतील भैरवगाव येथील रमेश कदम यांच्या घराच्या छपराची कवले, पत्रे व कोने वादळी वाऱ्याने उडून जात नुकसान झाले. तर वाघेरी उपकेंद्रावर फणसाच्या झाडाची फांदी पडून या उपकेंद्राचा विद्युत पुरवठा खंडित झाला. भिरवंडे रामेश्वरनगर येथील राजेंद्र सावंत यांच्या घराची कवले,कोने व पत्रे वादळी वाऱ्याने उडून जात नुकसान झाले. तर कुंभवडे येथील उमेश सुतार यांच्या सुतार शाळेच्या इमारतीच्या छपराचे कोने, पत्रे व कवले वादळी वाऱ्याने उडून जात नुकसान झाले. हुबरट येथे रस्त्यावर झाड पडल्याने या रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र तातडीने जेसीबी द्वारे हे झाड बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आल्याची माहिती तहसीलदार आर जे पवार यांनी दिली. नुकसानग्रस्त गावांमधील तलाठ्यांकडून तातडीने आपत्तीची पाहणी करण्यात आली. व कणकवली तहसीलदार आ र जे पवार यांना अहवाल सादर करण्यात आला. तहसीलदार आर जे पवार हे पहाटेपासूनच तहसीलदार कार्यालयात चक्रीवादळाच्या अनुषंगाने तालुक्यातील आपत्तीग्रस्त भागाचा आढावा घेत आहेत. तालुक्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्याने नुकसान झाले असून, त्यात पावसाची रिपरिप सुरू आहे.सकाळी वाऱ्याचा वेग वाढला असल्याने तालुक्यातील अन्य काही भागातीलही नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen − nine =