You are currently viewing सावंतवाडी तालुक्यातील तळवणे येथील युवकाची आत्महत्या

सावंतवाडी तालुक्यातील तळवणे येथील युवकाची आत्महत्या

 

कारण अजून अस्पष्ट: पोलिसांचा तपास चालू….

सावंतवाडी:

सावंतवाडी येथील तळवणे मठवाडी येथील किरण वासुदेव गावडे या १६ वर्षीय युवकाने आत्महत्या केली आहे. ही घटना शनिवारी रात्री सुमारे १० च्या दरम्यान घडली. किरण गावडे याने घराच्या बाजूच्या विहिरीत आत्महत्या केली. शोधाशोध सुरू असता किरण याचा मृतदेह घराच्या मागच्या विहिरीमध्ये आढळून आला.
तरी किरण याने आत्महत्या का केली याचे कारण अजून कळले नाही.मयत किरण गावडे याचे काका चौरंगनाथ गावडे यांनी पोलिसांना माहिती दिली आहे.
पुढील तपास आरोंदा दूरक्षेत्राचे इन्चार्ज विजय केरकर आणि बाबुराव जाधव करत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा