You are currently viewing सडूरे शिराळे येथे चक्रीवादळाने हजारोंचा नुकसान…

सडूरे शिराळे येथे चक्रीवादळाने हजारोंचा नुकसान…

चक्रीवादळाची लाट जाईपर्यंत सुरक्षित ठिकाणी रहावे.- ग्रा.प. सदस्य नवलराज काळे यांचे जनतेला आवाहन

जीवाची पर्वा न करता नुकसानीचे पंचनामे करणाऱ्या महसूल विभागाला सलाम

वैभववाडी

सद्या चालू असलेल्या चक्रीवादळाचा तडका सडूरे- शिराळे गावाला बसला आहे.अनेकांची घरांची कौले,पत्रे उडून गेल्याचे चित्र दिसत आहे तसेच काही आंबा काजू बागायतदारांचे कलम झाडे , फणस पडलेले आहेत.

चक्रीवादळाच्या सुरुवातीला ही नुकसान होणे गंभीर बाब आहे.या चक्रीवादळाचा तडाखा आज व उद्या 2 दिवस जास्त प्रमाणात बसण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहेत. चक्रीवादळा सहीत विजेच्या कडकड्यांसह अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.

या चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे महसूल खात्याकडून होत आहेत. प्रभारी तलाठी कांबळे मॅडम व गावचे कोतवाल मोहन जंगम यांच्या कडून हे पंचनामे होत आहेत.जीवाची पर्वा न करता नुकसानीचे पंचनामे करणाऱ्या महसूल विभागाला सलाम,या महासूल विभागाच्या अधिकारी कर्मचारी वर्गाला गावातील जनतेने सहकार्य करावे. झालेल्या नुकसानीचे पंचनाम्याप्रमाणे नुकसान भरपाई मिळवण्यासाठी शासनदरबारी विशेष पाठपुरावा करू. पण सद्या गावतील जनतेने चक्रीवादळाचा धोका जाई पर्यंत प्रशासनाच्या सूचनेचे पालन करून सुरक्षित ठिकाणी रहावे असे आवाहन ग्रामपंचायत सदस्य नवलराज विजयसिंह काळे यांनी सडूरे शिराळे मधील जनतेला केले आहे.

सडूरे येथे बाबाजी सावंत ,रामचंद्र(शाहू) बोडेकर, सागर मेजरी व मेजरीवाडीत घरे ,विजय बोडेकर,विठ्ठल बोडेकर,केशव बाणे यांच्या घरांचे नुकसान व सोनधरने येथे हापूस आंब्याच्या झाडांचे असे अंदाजे हजारोंचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे व अजुन चक्रिवादळ चालु असुन नुकसान होण्याच्या प्रक्रिया चालु असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

11 − five =