You are currently viewing सिंधुदुर्गात आपत्कालीन विभागात उद्या पहाटे ४ पासून पालकमंत्री स्वतः घेणार आढावा..

सिंधुदुर्गात आपत्कालीन विभागात उद्या पहाटे ४ पासून पालकमंत्री स्वतः घेणार आढावा..

*पालकमंत्री उदय सामंत सिंधुदुर्गात दाखल*

*तसेच उद्या सायंकाळी  ५.०० पासून रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयातील  आपत्कालीन विभागातून  घेणार रत्नागिरी जिल्ह्याचा आढावा*

सिंधुदूर्ग :

अरबी समुद्रातील तोत्के चक्रीवादळाच्या अनुषंगाने आज उदय सामंत यांनी रत्नागिरी जिल्ह्याचा आढावा घेऊन किनारपट्टीवरील भागात पूर्णपणे सतर्कता ठेवावी तसेच विविध यंत्रणांनी सावध राहून आवश्यक ते बचाव कार्य करावे अशा सुचना प्रशासनास दिल्या. तसेच स्वतःच्या रत्नागिरी मतदारसंघामधील किनारपट्टी भागातील मच्छीमाराना भेट देऊन त्या परिसरातील पाहणी करून पालकमंत्री या नात्याने सिंधुदुर्गामध्ये दाखल देखील झाले आहेत.

विशेषत: रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये या चक्रीवादळाचा प्रभाव जाणवणार असल्याने प्रशासनाने सज्ज राहावे व मनुष्यबळ तसेच साधन सामुग्री तयार ठेवावी असेही उदय सामंत यांनी सांगितले.

*पालकमंत्री या नात्याने उदय सामंत स्वत: आज आढावा घेत असून उद्या देखील  स्वतः पहाटे 4 पासून आपत्कालीन विभागातून यंत्रणेच्या कामाचा आढावा घेणार आहेत.*

पालकमंत्री उदय सामंत यांच्या *कर्तव्य दक्षतेच सिंधुदुर्ग वासीय कौतुक करत आहेत.*

*या कठीण प्रसंगात आपला पालकमंत्री आपल्या सोबत आहे ,आपल्या गावात आहे,आपल्या जनते सोबत आहे हाच मोठा आधार जनतेला मिळत आहे*

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांची जवाबदारी कोविड च्या या काळात अत्यंत जवाबदारीने पार पाडणारे *उदय सामंत उद्या पुन्हा सायंकाळी ५ वाजता  रत्नागिरीमध्ये दाखल होऊन आपात्कालीन विभागामधून रत्नागिरी जिल्ह्याचा आढावा घेणार आहेत*

प्रतिक्रिया व्यक्त करा