You are currently viewing रोटरी क्लब सावंतवाडीचा आरोग्य दिन साजरा

रोटरी क्लब सावंतवाडीचा आरोग्य दिन साजरा

सावंतवाडी

रोटरी क्लब आँफ सावंतवाडीच्या वतीने २३ डिसेंबरपर्यंत आरोग्य दिन साजरा करण्यात आला.यानिमित्ताने २० डिसेंबर पासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. नेत्र – तपासणी शिबीर, दंत चिकित्सा,मुख आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. या दोन्ही शिबीराचे उदघाटन नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते झाले. नेत्रतपासणी नेत्र तज्ज्ञ डाँ. विशाल पाटील यांनी केली.
दंत व मुख आरोग्य शिबीरात डाँ. अनिश स्वार आणि मुख आरोग्यासाठी डाँ. अजय स्वार यांनी सहकार्य केले.२१ आणि २२ डिसेंबर रोजी डाँ. राजेश नवांगुळ
हाँस्पिटलमध्ये गर्भवती स्त्रियांसाठी आयोजित माता आणि बालक आरोग्य शिबीर झाले.रोटरँक्ट कल्बचे अध्यक्ष हर्षद चव्हाण, सचिव दिलीप म्हापसेकर,वसंत करंदीकर, सत्यजित धारणकर, साईप्रसाद हवालदार,
सचिन देशमुख तर राँटरी क्लब वेंगुर्ला मिडटाउनचे माजी अध्यक्ष राजेश घाटवळ मुद्दामहून नेत्र,दंत आणि मुख आरोग्य शिबीरासाठी उपस्थित होते. राजेश घाटवळ यांनी नँबच्या नेत्र रुग्णालयासाठी रु. १0 हजारांची देणगी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four + thirteen =