शिक्षक वर्ग व कुटुंबीयांसाठी मोफत ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन.

शिक्षक वर्ग व कुटुंबीयांसाठी मोफत ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन.

ग्राहक पंचायत महाराष्ट्र जिल्हाध्यक्ष प्रा. एस एन पाटील यांची माहिती.

कणकवली :

शिक्षकांची जीवनशैली त्यांना होणारे विकार व उपचार या विषयावर माधवबाग कणकवली व कुडाळ शाखा आणि सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ ग्राहक पंचायत महाराष्ट्र सिंधुदुर्ग शाखेतर्फे घर बसल्या मोबाईल मधील झूम ॲप द्वारे शुक्रवार दिनांक 18 सप्टेंबर 2020 रोजी सायंकाळी 6.30 वाजता मोफत ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती ग्राहक पंचायत महाराष्ट्र सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष प्राचार्य एस एन पाटील यांनी दिली.

मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, हृदयविकार हे आजार असणाऱ्या व्यक्तींची रोगप्रतिकारशक्ती दिवसेंदिवस कमी होत जाते. त्यामुळे जगभरामध्ये या व्यक्ती कोरोना व इतर आजारांना सहज बळी पडत आहेत हे आपण पाहत आहोत.योग्य ती काळजी घेतल्यास हे विकार आटोक्यात ठेवणे व रोगप्रतिकारक क्षमता वाढवणे सहज शक्य आहे.या एका तासाच्या ऑनलाईन कार्यक्रमांमध्ये माधवबाग कम्युनिटी हेल्थ प्रमुख मिलिंद सरदार व डॉ. स्मिता झांबरे सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत.सदर कार्यक्रम सर्व शिक्षक वर्ग आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी मोफत असून सहभागी होण्यासाठीचे सोपी प्रक्रिया पुढीलप्रमाणे आहे.

• सदर आरोग्यविषयक कार्यशाळेमध्ये सहभागी होण्यासाठी रजिस्ट्रेशन लिंक वर जाऊन आपली नोंदणी करावी.
•आपल्या मोबाईल प्ले स्टोअर मधून झूम नावाचे ॲप्लिकेशन डाऊनलोड करून ठेवावे.
•शुक्रवार दि. 18 सप्टेंबर रोजी आपल्याला कार्यक्रमाची लिंक पाठवली जाईल या लिंक वर क्लिक केल्यानंतर आपण कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ शकता.
•कार्यक्रम संपल्यानंतर व्हाट्सअप ग्रुप वर फीडबॅक लिंक पाठवली जाईल ती भरल्यानंतर आपल्या मेलवर ई- प्रमाणपत्र प्राप्त होईल.

याच्या व्यतिरिक्त अधिक माहितीसाठी माधवबाग कणकवली 9373183888, माधवबाग कुडाळ 9011328581, सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ अध्यक्ष वामन तर्फे 9422584185, व ग्राहक पंचायत महाराष्ट्र सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रा. एस एन पाटील 9423300321 यांच्याशी संपर्क साधावा.तसेच या आरोग्यविषयक कार्यशाळेचा लाभ जिल्ह्यातील शिक्षक व त्यांच्या कुटुंबियांनी घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा