You are currently viewing टाटा मेमोरियल हॉस्पिटल माध्यमातून राधारंग फौंडेशन कडून सिंधुदुर्गात ऑक्सिजन कॉन्सन्ट्रटरचा पुरवठा

टाटा मेमोरियल हॉस्पिटल माध्यमातून राधारंग फौंडेशन कडून सिंधुदुर्गात ऑक्सिजन कॉन्सन्ट्रटरचा पुरवठा

सिंधुदूर्ग :

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचे संकट वाढत आहे, गेले तीन दिवस प्रत्येक दिवशी सहाशे पेक्षाही जास्त पॉझिटिव्ह रुग्ण सापडत असून दिवसाला १५ लोक मृत्युमुखी पडले आहेत. वाढती रुग्णसंख्या आणि मृत्युदर नक्कीच जिल्ह्याच्या प्रतिमेला शोभणारा नसून जिल्हा कोरोनाच्या महासंकटात खूपच कठीण परिस्थितीत असल्याचं दिसत आहे. कोरोनाच्या महामारीत रुग्णांची ऑक्सिजन लेवल कमी होत असल्याने ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. अशा कठीण परिस्थितीत मुंबई येथील राधारंग फाउंडेशनने टाटा मेमोरियल हॉस्पिटल, परेल मुंबईच्या सहकार्यातून अमेरिकेतील भारतीय वंशाच्या डॉक्टरांकडून मदतीने मिळालेले २० ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर मालवण येथील नाथ पै सेवांगणाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या ज्या रुग्णालयात, कोविड केअर सेंटर मध्ये गरज असेल तिथे मोफत वितरित करण्यात आले.

राधारंग फाउंडेशन ही संस्था सामाजिक बांधिलकी जपत समाजकार्य करत असून कोविडच्या संकटात सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्भवलेल्या परिस्थितीत आपले कर्तव्य समजून जिल्हावासीयांची ऑक्सिजनची गरज ओळखून जिल्ह्यासाठी टाटा मेमोरीयलच्या डॉ.प्रमेश आणि डॉ.गिरीश यांच्या प्रयत्नातून हे ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर मिळाले व राधारंग फाउंडेशनच्या शुभा मुदगल यांनी  हे ऑक्सिजन कॉन्सन्टेटेर मिळविण्यासाठी प्रयत्न केले. राधारंग फाउंडेशनने कोरोना उपचार मदतनिधीसाठी सीएम व पिएम केअर्स फंड ना प्रत्येकी रुपये १००००/- मदतही केली आहे.

जिल्ह्यासाठी राधारंग फाउंडेशनने १० पोर्टेबल ऑक्सिजन कॉन्सट्रेटर जे घरातही वापरता येतील तसे व १० मोठे ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मिळवून दिले जे कोविड केअर सेंटर, हॉस्पिटल साठी देखील वापरता येतात. अशाचप्रकारे जिल्ह्यासाठी इतर संस्थांनी देखील आपापल्या परीने मदत मिळवून दिली तर नक्कीच जिल्ह्यातील कोविड रुग्णांना दिलासा मिळू शकेल.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen − six =