अंतिम वर्षाच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना लोकल ट्रेन ने प्रवासास मजुरी

अंतिम वर्षाच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना लोकल ट्रेन ने प्रवासास मजुरी

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करुन विद्यार्थ्यांना सरासरी मार्क्स देण्याची भूमिका राज्य सरकारची होती.

मुंबई:

यूजीसीने गाईडलाईन्सनुसार परीक्षा घेणाच्या सूचना दिल्या होत्या. यूजीसीच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. त्यावर सर्वोच्च न्यायालयानेही परीक्षा रद्द करण्यास नकार दिला. त्यामुळे आता महाराष्ट्रात ऑनलाईन पद्धतीने अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत अंतिम वर्षाच्या परीक्षा १ ऑक्टोबर २०२० पासून ते १७ ऑक्टोबर २०२० या कालावधील घेण्यात येणार आहेत. लेखी परीक्षा साठी १ तासाच्या कालावधी असणार आहे.

अंतिम वर्षाच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना आपले वैध आयकार्ड आणि हॉल तिकिट दाखवल्यानंतर मुंबई उपनगरीय लोकल ट्रेनने प्रवास करता येणार आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑक्टोबर महिन्यात होणार आहेत. त्यामुळे या परीक्षा देणारे विद्यार्थी, इतर स्पर्धा परीक्षेला बसणारे विद्यार्थी यांना लोकलने प्रवास करता येणार आहे. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना लोकलने प्रवास करता यावा या करता राज्य सरकारने मागणी केली होती त्यानंतर रेल्वे बोर्डाकडून या मागणीला मंजुरी देण्यात आली आहे.या विद्यार्थ्यांना लोकलने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.

मात्र लोकलने प्रवास करताना कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेले नियम, सोशल डिस्टंसिंग, मास्क परिधान करण्याचे आवाहन रेल्वे कडून केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा