You are currently viewing गोव्यात कामाला जाणाऱ्या मुलांनी तूर्तास गोव्यातच राहावे…दीपक केसरकर

गोव्यात कामाला जाणाऱ्या मुलांनी तूर्तास गोव्यातच राहावे…दीपक केसरकर

रुग्ण वाढत असल्यामुळे त्या ठिकाणचे निर्णय न्यायालयाच्या कक्षेत…

सावंतवाडी

गोव्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी कामाला जाणाऱ्या जिल्हातील मुलांनी अप-डाऊन न करता त्याच ठिकाणी रहावे,याबाबत गोव्याच्या मुख्यमंत्र्यांची चर्चा सुरू आहे. मात्र तूर्तास त्यांना आरटीपीसीआर देणे बंधनकारक असेल,असे मत आमदार दीपक केसरकर यांनी आज येथे मांडले.
अप-डाऊन करणाऱ्या मुलांना ७२ तासातील आरटीपीसीआर बंधनकारक करण्यात आल्यामुळे काल येथील पत्रादेवी नाक्यावर संबंधित मुलांनी रास्ता रोको केला होता,तर यावरून गोव्यात रुग्ण वाढत असल्यामुळे हीबाब आता न्यायालयाच्या कक्षेत आहे,अशी भूमिका गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मांडली होती.या पार्श्वभूमीवर भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आपण चर्चा करून सकारात्मक तोडगा काढू,असे आश्वासन दिले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 − 14 =