You are currently viewing लॉकडाऊनमध्ये 1 जून 2021 रोजी पर्यंत वाढ…

लॉकडाऊनमध्ये 1 जून 2021 रोजी पर्यंत वाढ…

सिंधुदुर्गनगरी

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून सार्वजनिक हिताच्‍या दृष्‍टीने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व प्रसार रोखणे आणि त्‍यासाठी ठोस उपाययोजना हाती घेणे आवश्‍यक झाले आहे. राज्‍यात Break the Chain अंतर्गत ताळेबंदीचा कालावधी दिनांक ०१/०६/२०२१चे सकाळी ७.०० पर्यंत वाढवून यापूर्वीच्‍या आदेशान्‍वये दिलेल्‍या मार्गदर्शक सूचनासह खालीलप्रमाणे आणखी काही अतिरिक्‍त निर्बंध लागू राहतील असे निर्देशीत केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडील दिनांक २२ एप्रिल २०२१ व ३० एप्रिल २०२१ मधील अटी व शर्तीसह पुढील प्रमाणे अतिरिक्‍त निर्बंध लागू करुन संपूर्ण जिल्‍हयात दिनांक ०१ जून २०२१ चे सकाळी ७.०० पर्यंत टाळेबंदीचा (Break the chain) कालावधी वाढविण्‍यात येत आहे.

        कोणत्‍याही वाहनाने महाराष्‍ट्र राज्‍यात प्रवेश करणाऱ्या व्‍यक्‍तींनी Negative (नकारात्‍मक) RTPCR चाचणीचा अहवाल सोबत बाळगणे आवश्‍यक आहे. सदर चाचणी अहवाल राज्‍यात प्रवेशाच्‍या ४८ तासांपूर्वीचा असावा. संवेदनशील ठिकाणाहून येणाऱ्या व्‍यक्‍ती मग त्‍या देशातील कोणत्‍याही प्रदेशातील असो त्‍यांना यापूर्वीचे आदेश दिनांक १८ एप्रिल व १ मे मधील सर्व प्रतिबंध लागू राहतील. कार्गो वाहतूकीमध्‍ये १ चालक व सफाईगार अशा दोन व्‍यक्‍तीनाच परवानगी असेल. जर कार्गो वाहतूक ही राज्‍याबाहेरील असेल तर त्‍या वाहनातील कर्मचारी यांनी Negative (नकारात्‍मक) RTPCR चाचणी अहवाल सोबत बाळगणे आवश्‍यक आहे. सदर अहवाल राज्‍यातील प्रवेशाच्‍या ४८ तासांपूर्वीचा असावा व तो ७ दिवसांकरिता वैध राहील. स्‍थानिक आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरणाने ग्रामीण बाजार व कृषि उत्‍पन्‍न बाजार समित्‍यांवर कोविड १९ संसर्गाच्‍या अनुषंगाने विशेष निगराणी ठेवावी आणि जर अशा ठिकाणी कोविड १९ चा संसर्ग रोखण्‍याच्‍या दृष्‍टीने अडथळा येत असेल असे निदर्शनास आल्‍यास सदर ठिकाणे बंद करणेबाबत किंवा बंधने कडक करणेबाबत निर्णय घ्‍यावा. दूध संकलन, वाहतूक, प्रकिया निर्बंधाशिवाय चालू राहतील. परंतू अत्‍यावश्‍यक वस्‍तूंचे व्‍यवहार किंवा होम डिलिव्‍हरीवर जी बंधने लागू असतील त्‍या बंधनासह किरकोळ विक्रीस परवानगी दिली जावी. विमानतळ आणि बंदर सेवांमध्‍ये व्‍यस्‍त असलेले आणि कोविड व्‍यवस्‍थापनासाठी आवश्‍यक असलेल्‍या औषधाशी संबंधित वस्‍तू किंवा उपकरणे यांचे वाहतूकीशी संबंधित व आवश्‍यक असणाऱ्या  कर्मचाऱ्यांना स्‍थानिक, मोनो, मेट्रो सेवांमध्‍ये प्रवास करण्‍याची परवानगी  देण्‍यात येईल. आवश्‍यक असल्‍यास विशिष्‍ट भागांकरिता इतर काही निर्बंध स्‍थानिक आपत्‍ती प्राधिकरण लावू शकेल पण त्‍यापूर्वी उपविभागीय प्राधिकरणास अशा प्रकारचे निर्बंध लावीत असलेबाबत ४८ तासांपूर्वी पूर्वसूचना देण्‍यात याव्‍यात.

            उपरोक्‍त बाबी वगळता यापूर्वी वेळोवेळी निर्गमित करण्‍यात आलेले आदेश व सूचना वा त्‍यात उल्‍लेख असलेल्‍या बाबी या सर्व निर्बंधासह पुढील आदेश होईपर्यंत तश्‍याच लागू राहतील.

            या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणत्‍याही व्‍यक्‍ती अथवा संस्‍थेवर भारतीय दंड संहिता १८६० याच्‍या कलम १८८, आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अधिनियम २००५ व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतूदीप्रमाणे फौजदारी कारवाई करण्‍यात येईल असे आदेश जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen − ten =