You are currently viewing सामान्य जनता फक्त निवडणूक आल्यावरच दिसते का?

सामान्य जनता फक्त निवडणूक आल्यावरच दिसते का?

 मनसे सचिव आकाश परब यांचा सवाल.

सावंतवाडी

सामान्य जनता आपल्या हितासाठी व अडचणीच्या काळात मदत मिळावी. गरजा पूर्ण व्हाव्यात यासाठी तुम्हाला एका विश्वासाने निवडून देते. तर निवडून आल्यानंतर त्या राज्याच्या प्रत्येक नागरिकाची जबाबदारी ही सरकारची असते. पण सध्याच्या परिस्थितीत होणारी लुबाडणूक, ज्या जनतेने तुम्हाला निवडून दिले त्याच सर्व सामान्य जनतेला आज हाॅस्पिटल मध्ये एक बेड मिळताना मुश्किल झाला आहे. ऑक्सिजन अभावी किती रुग्णांचा मृत्यू होत आहे. किती संसार उद्धवस्त होतायंत, किती मुलं अनाथ होत आहेत, बेरोजगारी वाढत आहे. जनतेला या काळात मोफत सोयी-सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत त्याऐवजी जनतेची लुट होतं आहे. एकतर हातामध्ये काम नाही त्यात एका बेडसाठी पंधरा-वीस हजार रुपये मोजावे लागत आहेत. जनतेची होणारी ही लुट थांबवून त्यांना चांगल्या सुविधा द्या. एवढीच जनतेची मागणी आहे.

सरकारने ठरवलं तर ४ दिवसांत महाराष्ट्र कोरोना मुक्त होईलं !! कोणताही साथीचा रोग हद्दपार करायचा असेल तर, लसीकरण, औषधोपचार, समाज जागृती, सर्वात शेवटी लॉकडाऊन ! लस पुण्यात तयार होते ! महाराष्ट्राची लोकसंख्या १२ कोटी ! १२ कोटी लसी ३ दिवसांत सिरम तयार करते. महाराष्ट्रात मतदान केंद्र नाही असं गाव नाही , आणि एसटी पोहचत नाही असं गाव नाही ! निवडणूकीला हीच यंत्रणा काम करते ! म्हणजे लस वितरण व्यवस्था व लसीकरण केंद्र तयारच आहेत ! पश्न आहे फक्त लस देण्याचा ! प्रत्येक मतदान केंद्रात शिक्षक – तलाठी- ग्रामसेवक ही यंत्रणा मदतीला आहेच ! ( सर्व क्षेत्रातील कर्मचारी व अधिकारी कामाला लागले तर घरातून ओढून आणून लस देणं शक्य आहे , एवढी यंत्रणा सरकार कडे आहे . ) सरकारी व खाजगी हॉस्पिटलचे डॉक्टर, सर्व स्टाप लस टोचण्यासाठी सहखुशीने सरकारच्या मदतीला येतील ! लस मोफत असल्याने काळाबाजार किंवा हेराफेरीचा प्रश्न येणारच नाही ! बरं सर्व ४० खासदार , २८८ आमदार , मुख्यमंत्री , विरोधी पक्ष यांनी प्रधानमंत्री महोदयांना १२ कोटी लसीची एकमुखाने मागणी केली , तर एका मिनिटात लस उपलब्ध होईल ! हे करू शकतं फक्त सरकार आणि निवडणूक आयोग सरकारला जमत नसेल तर निवडणूक आयोगाला सांगा ते देतील लसीकरण करून ! लसीकरण औषधोपचार करून जर कोरोना नियंत्रित होत नसेल तर लॉकडाऊन केला पाहिजे ! सरकारला कोरोनाच्या नावाने राजकारण करायचे आहे , का खरंच कोरोना हद्दपार करायचा आहे ते अगोदर ठरवावं.  सरकारने ४ दिवस ! दिवस रात्र लसीकरण मोहीम राबवली तर कोरोना आडनावाला शिल्लक राहणार नाही !… ५४५ खासदार , २४५ राज्य सभा खासदार , ४१२० देशातील आमदार यांनी प्रत्येकी ५ लाख रुपये जरी दिले तर २,४५५,०००,००० , लाख २ अरब ४५ कोटी ५० लाख रुपये जमा होतील. यात – आजी – माजी खासदार , आमदार हे जर पुढे आले तर भारतीय अर्थ व्यवस्था पण मजबुत होईल. आता वेळ या राजकारणी लोकांची आहे , जनतेसाठी कोण कोण पुढे येतं हे पाहण्याची , निवडणूकीत करोडो लाखो रुपये खर्च करणारे जनतेसाठी पुढे या … अशी विनंती भारतीय नागरीक म्हणून मनसेच्या वतीने करीत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × 5 =