You are currently viewing न्यू इंग्लिश स्कूल, फोंडाघाट प्रशालेचा इयत्ता दहावीचा निकाल 100%

न्यू इंग्लिश स्कूल, फोंडाघाट प्रशालेचा इयत्ता दहावीचा निकाल 100%

फोंडाघाट

एस.एस.सी.परीक्षा मार्च 2021 मध्ये कोकण विभागीय मंडळाच्या मूल्यमापन पद्धतीनुसार जाहीर केलेला इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला असून न्यू इंग्लिश स्कूल, फोंडाघाट प्रशालेचा निकाल 100% लागला. सदर परीक्षेसाठी प्रशालेचे 129 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 129 विद्यार्थी पास होऊन शाळेचा निकाल 100% लागला आहे.
90 व 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण प्राप्त केलेले विद्यार्थी.
१) गवळी रुपेश संतोष. 99.60% (प्रथम)
२) कु.पेडणेकर दुर्वा दीपक. 97.20% (द्वितीय)
३) पवार साहिल सुनील. 96.20% (तृतीय)
४) लाड समर्थ लक्ष्मण. 95.40%
५) भोये सुमित गोकुळ. 94.40%
६) कु. राठोड पूजा देविदास. 94.40%
७) पाचंगे संभाजी अप्पासाहेब. 94.00%
८) राणे मयुरेश जगदीश. 93.00%
९) कु. टक्के गायत्री सुरेश. 91.60%
१०) कु. गोसावी रोशनी केशव. 91.20%
११) कु. भोगटे भूमी प्रमोद. 90.00%
वरील ११ विद्यार्थी 90 व 90 %पेक्षा जास्त गुण घेऊन यशस्वी झाले. यावर्षी सुद्धा प्रशालेने उज्वल निकालाची परंपरा कायम राखली.
न्यू इंग्लिश स्कूल,फोंडाघाट प्रशालेतील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे फोंडाघाट एज्यु. सोसायटीचे चेअरमन, सेक्रेटरी,स्कूल कमिटीचे चेअरमन, खजिनदार तसेच सर्व संचालक मंडळ, प्रशालेचे मुख्याध्यापक, शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद यांच्याकडून त्यांचे अभिनंदन करण्यांत आले. व त्यांच्या पुढील उज्जवल वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 − four =