10 वी, 12 वी परीक्षा केंद्र परिसरात कलम 144  लागू…..

10 वी, 12 वी परीक्षा केंद्र परिसरात कलम 144  लागू…..

कोल्हापूर

दि. 17 (जिल्हा माहिती कार्यालय) :  इयत्ता 10 वी व 12 वी परीक्षा केंद्राच्या/ उपकेंद्राच्या 100 मीटर परिसरात दि. 20 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर  या कालावधीत (ज्या दिवशी परीक्षेचे पेपर नसतील ते दिवस वगळून) दररोज सकाळी 7 वाजल्यापासून ते सायं. 6 वाजेपर्यंत सी.आर.पी.सी. 1973 चे कलम 144 अन्वये मोबाईल फोन बाळगण्यास/ वापरण्यास, झेरॉक्स मशिन, फॅक्स मशिन, पेजर व लॅपटॉप यांचा वापर करण्यास अपर जिल्हादंडाधिकारी भाऊ गलांडे यांनी बंदी घातली आहे.

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती फौजदारी कारवाईस पात्र राहतील. हा बंदी आदेश परीक्षेच्या कामकाजासाठी नेमलेले अधिकारी व कर्मचारी यांना व त्यांना नेमून दिलेल्या परीक्षेच्या कामकाजासाठी हाताळाव्या लागणाऱ्या उपकरणांसाठी लागू राहणार नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा