ग्रामपंचायत वरची गुरामवाडी येथे लसीकरण केंद्राची सुरुवात

ग्रामपंचायत वरची गुरामवाडी येथे लसीकरण केंद्राची सुरुवात

माजी वित्त व बांधकाम सभापती संतोष साठविलकर यांचे विशेष प्रयत्न

ग्रामपंचायत वरची गुरामवाड येथे ग्रामपंचायत हद्दीतील लोकांना लसीकरण सुरू करण्यात आले. गावातील जास्तीत जास्त लोकांना जवळच्या जवळ लसीकरण करून घेणे शक्य व्हावे. यासाठी हे विशेष प्रयत्न करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर आज १८ ते ४४ या वयोगटातील १०० नागरिकांना लसीकरण करण्यात आले. यावेळी गावातच ही सोय करून दिल्याबद्दल ग्रामस्थांनी श्री साठविलकर व ग्रामपंचायत वरची गुरामवाड यांचे आभार मानलेत.

यावेळी माजी वित्त व बांधकाम सभापती संतोष साठविलकर, माजी सरपंच सतीश वाईरकर, सरपंच स्वाती वाईरकर, उपसरपंच मकरंद सावंत, ग्रामपंचायत सदस्य हृषिकेश पेणकर, गणेश वाईरकर, ग्रामसेवक लक्ष्मण सरमळकर, सागर मालवदे, संकेत परुळेकर, आरोग्य सहाय्यक परब, आरोग्य सेवक वाडकर, श्री नागरे, आरोग्यसेविका सौ नाईक मॅडम, आशा सेविका ढोलम, सौ.साळगावकर, सोनाली गुराम, डाटा ऑपरेटर व ग्रामस्थ पिंटू खटावकर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा