You are currently viewing नाधवडे येथील आरोग्य उपकेंद्रात आज लसीकरणाचा शुभारंभ..

नाधवडे येथील आरोग्य उपकेंद्रात आज लसीकरणाचा शुभारंभ..

जि. प. अध्यक्ष सौ. संजना सावंत, सदस्य सुधीर नकाशे यांच्या पाठपुराव्याला यश

वैभववाडी

नाधवडे येथील आरोग्य उपकेंद्रात आज लसीकरणाला सुरुवात झाली आहे. जि. प. अध्यक्ष संजना सावंत व सदस्य सुधीर नकाशे यांच्या पाठपुराव्यामुळे नाधवडे उपकेंद्रात लसीकरण सुरू झाले आहे. या केंद्रावर बुधवारी सकाळपासून 45 वर्षावरील नागरिकांना लसीकरण करण्यात येत आहे. शुभारंभ प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य सुधीर नकाशे, माजी उपसभापती बंड्या मांजरेकर, बंडूकाका मुंडल्ये, माजी सरपंच अनिल नारकर, चेअरमन रवींद्र गुंडये, उपसरपंच बाळू कांबळे, बाबा कोकाटे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल पवार, आरोग्य सहाय्यक आनंदा चव्हाण, स्वप्निल रेवडेकर, डॉ. अभी पाटील, आरोग्यसेविका श्रीमती कातकर व ग्रामस्थ, आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

या उपकेंद्रात लसीकरण सुरू झाल्याने नाधवडेसह कोकिसरे, नापणे व इतर गावातील नागरिकांना याचा चांगला फायदा होणार आहे. लसीकरण केंद्रावर मदतीसाठी ग्रा.पं. कर्मचारी, स्थानिक संस्था पदाधिकारी व ग्रामस्थ कार्यरत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

9 − two =