You are currently viewing सावंतवाडीत डोस उपलब्ध झाल्याचे समजताच नागरिकांची सकाळी सहा वाजल्यापासून केंद्रावर गर्दी

सावंतवाडीत डोस उपलब्ध झाल्याचे समजताच नागरिकांची सकाळी सहा वाजल्यापासून केंद्रावर गर्दी

लसीसाठी एकच गोंधळ; सोशल डिस्टंसिंगचा फज्जा, नागरिकांच्या गोंधळासमोर आरोग्य विभाग हतबल

अखेर आमदार केसरकरांनी लसीकरण केंद्रावर भेट देत नागरिकांची घातली समजूत

सावंतवाडी
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात आज सोमवारी पंचेचाळीस वर्षावरील व्यक्तींना दुसरा डोस उपलब्ध झाला आहे हे समजताच सकाळी सहा वाजल्यापासूनच दुसरी लस घेण्यासाठी नागरिकांनी तोबा गर्दी केली होती. सकाळी 9 वाजता केंद्र सुरू होताच डॉक्टर व कर्मचाऱ्यांसोबत या नागरिकांनी हुज्जत घालत, सोशल डिस्टंसिंगचे नियम न पाळत अक्षरशः लससाठी एकच गोंधळ सुरू केला. आरोग्य विभाग नागरिकाच्या या गोंधळमुळे हतबल झाले. अखेर माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांना लस केंद्रामध्ये यावे लागले. केसरकर यांनी नागरिकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. एकीकडे कोरोना महामारीचे संकट ओढवले असताना लससाठी मात्र नागरिक गर्दी करत गोंधळ घालत आहेत. लसीच्या तुटवड्यामुळे नागरिक जी गर्दी करत आहेत त्यामुळे आता या सर्व गोष्टींकडे लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने पाहण्याची गरज आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा

one + seven =