You are currently viewing राष्ट्रकवी संजय निकम विशेष सत्काराने सन्मानित

राष्ट्रकवी संजय निकम विशेष सत्काराने सन्मानित

मालेगाव / प्रतिनिधी :

भिडे वाडा बोलला या आंतरराष्ट्रीय काव्य स्पर्धेचे आयोजन पुणे येथे भिडे वाडाकार विजय वडवेराव यानी केले होते. या करता देश विदेशातून कविता मागवण्यात आल्या होत्या. विविध कवी आणि कवयित्री नी या स्पर्धेत भाग घेतला होता. राष्ट्रकवी संजय मुकूंदराव निकम यांना या कार्यक्रमात आमंत्रित करण्यात आले होते. या वेळी मी भिडे वाडा बोलतोय ही राष्ट्र कवी व लेखक संजय मुकूंदराव निकम यानी स्वत: लिहिलेली कविता सादर केली. या कवितेने देश विदेशातील लोकांची मने जिंकली. कवी संजय मुकूंदराव निकम याना राष्ट्र कवी ही ओळख त्यांच्या देश भक्तिपर कवितानी दिलेली आहे. काव्य स्पर्धा आयोजक विजय वडवेराव यानी राष्ट्रकवि संजय मुकूंदराव निकम यांचे हार्दिक स्वागत केले. आणि त्यांचा उपस्थित श्रोत्यांना परिचय करुन दिला. राष्ट्रकवी संजय मुकूंदराव निकम यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यांना विशेष कविता सादर केल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. सन्मान पत्र प्रदान करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा