You are currently viewing उपजिल्हा रुग्णालयात कोविड १९ ची तपासणी आणि लसीकरण यासाठी शिवसेनेचा पुढाकार

उपजिल्हा रुग्णालयात कोविड १९ ची तपासणी आणि लसीकरण यासाठी शिवसेनेचा पुढाकार

सर्वांना देणार रिक्षेची मोफत सुविधा…

कणकवली

शहर शिवसेनेकडुन पुढाकार घेत कणकवली शहरातील १७ प्रभागातील कोविड लसीकरणासाठी शासन नियमानुसार पात्र असलेल्या, शहरवासीयांना आणि ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणासाठी उपजिल्हा रुग्णालयात ये – जा करण्यासाठी रिक्षेची मोफत सुविधा शहर शिवसेनेकडुन उपलब्ध करून देण्यात येत आहे.

त्यामुळे ८०% समाजकारण, २०% राजकारण हा मंत्र शिवसैनिकांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिला आहे. हाच मंत्र कणकवली शहर शिवसेनेने कोविडच्या कठीण काळात अंमलात आणल्याचे दिसुन येत आहे. त्याचाच एक भाग म्हणुन आज गुरुवारी सकाळी लस उपलब्ध झाल्यानंतर कणकवली शहरातील १७ प्रभागातील कोविड लसीकरणासाठी शासन नियमानुसार पात्र असलेल्या शहरवासीयांना आणि ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणासाठी उपजिल्हा रुग्णालयात येण्या – जाण्यासाठी रिक्षेची मोफत सुविधा शहर शिवसेनेकडुन उपलब्ध करून देण्यात येत होती

आजपासुन सलग पाच दिवस कणकवली शहर शिवसेनेच्यावतीने १७ प्रभागांमध्ये नागरिकांसाठी ही सुविधा उपलब्ध असणार आहे. यासाठी प्रभागनिहाय प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्त्यांवर जबाबदारी निश्चित करून देण्यात आली आहे.

लसीकरणासाठी पात्र असलेल्या शहरातील लाभार्थ्यांना त्यांच्या घरापासुन लसीकरण सेंटरपर्यंत रिक्षेची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. लसीकरण पुर्ण झाल्यानंतर त्या नागरिकाला पुन्हा घरापर्यंत रिक्षेद्वारे सोडण्याची व्यवस्था ही शिवसेनेकडुन होणार आहे.

सकळी १०.३० पर्यंत सुमारे ५० जणांचे रजिस्ट्रेशन करून झाले होते. आणखीही शहरातील नागरिक या सुविधेचा लाभ घेत होते, अशी माहिती शिवसेनेचे गटनेते नगरसेवक सुशांत नाईक, नगरसेवक कन्हैया पारकर यांनी लसीकरणाच्या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांचे रजिस्ट्रेशन करताना दिली.

यावेळी बाबु जाधव, रूपेश साळुंखे, संतोष राणे, समीर सावंत आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 1 =