ग्रुप ग्रामपंचायत सडुरे-शिराळे हद्दीत विकास कामांना निधी मिळणे बाबत

ग्रुप ग्रामपंचायत सडुरे-शिराळे हद्दीत विकास कामांना निधी मिळणे बाबत

आ. नितेश राणे यांच्याकडे ग्रा.पं. सदस्य तथा भाजपा युवा मोर्चा तालुका सरचिटणीस नवलराज काळे यांची निवेदना द्वारे मागणी

वैभववाडी

तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत सडुरे-शिराळे हद्दीतील अतिशय महत्त्वाच्या दोन रस्त्यांसाठी निधींची अत्यंत गरज असल्याचे निवेदनात ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे यांनी म्हटले आहे. सडुरे राणेवाडी ते चव्हाणवाडी रस्ता व शिराळे जि.प.शाळा ते शिराळे घोरप्याचा मांड(धनगर वस्ती कडे जाणारा) रस्ता या दोन रस्त्यांच्या निधींची मागणी आमदार नितेश राणे यांच्याकडे काळे यांनी केली आहे.
पुढे निवेदनात म्हणाले गेले कित्येक वर्ष या वाडींचा रस्त्यांअभावे विकास खुंटला आहे. या आधीही आमदार फंडातून सडुरे चव्हाणवाडीच्या रस्त्यासाठी निधी मिळाला होता.  पण  त्यावेळी जमिनींअभावे/तत्कालीन गावातील लोकप्रतीनींची इच्छा शक्ती नसल्यामूळे तो निधी त्या वाडी साठी वापरता आला नाही. मात्र यावेळी पर्यायी मार्ग शोधुन आम्ही नविन ठिकाणावरुन चव्हाणवाडीत येण्यासाठी जनतेच्या सहकार्याने मार्ग काढला आहे.  तसेच शिराळे जि.प.शाळा ते शिराळे घोरप्याचा माळ रस्त्यांला सुरवातीस लागणारी जाग़ा कमी पडत होती. ती अडचण संबधित जमिन मालकांशी चर्चा करुन सोडवुन घेतली असुन या दोन्ही वाडीच्या रस्त्यांचे काम आम्ही ग्रा.पं.14 वित्त आयोगातुन सुरु करुन मंजुर निधींची कामे पुर्ण केली आहेत. पण पुढील कामे निधीं अभावी प्रलंबित आहेत. तरी सदर दोन्ही रस्त्यांसाठी लागणारा निधी आपले कडुन लवकरात लवकर उपलब्ध व्हावा, अशी मागणी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य तथा भाजपा युवा मोर्चा तालुका सरचिटणीस नवलराज काळे यांची निवेदनाद्वारे केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा