You are currently viewing संविता आश्रमास उमेद फौंडेशनचा मदतीचा हात

संविता आश्रमास उमेद फौंडेशनचा मदतीचा हात

बांदा
कुडाळ तालुक्यातील पणदूर येथील संविता आश्रमास उमेद फौंडेशनच्यावतीने जीवनावश्यक धान्यादी वस्तू देऊन मदत करण्यात आली.
कोरोना महामारीमुळे उद्भवलेल्या बिकट परिस्थितीत गेल्या वर्षभरापासून आश्रमास भेट देणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे.त्यामुळे आश्रमास मिळणाऱ्या सहकार्यावर मर्यादा पडली आहे.अशा परिस्थितीत आश्रमाने केलेल्या मदतीच्या आवाहनाला उमेद फौंडेशनच्या वतीने प्रतिसाद दिला. फौंडेशनच्या मार्फत तात्काळ आश्रमास रुपये १३५०० किमतीचे जीवनावश्यक धान्य व धान्यादी माल सुपूर्द करण्यात आला.
गतवर्षीही उमेद फाउंडेशनच्या वतीने ५५हजार रुपये किमतीची वस्तूरुप मदत या आश्रमाला करण्यात आली होती. उमेदमार्फत गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य,शिष्यवृत्ती देण्यात येते.सध्या निराधार मुलांच्या शिक्षणासाठी उमेद मायेचं घर हा महत्वाकांक्षी प्रकल्प उभा होत आहे.
उमेद संस्थापक सदस्य प्रदीप नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उमेदीयन सूर्यकांत चव्हाण, स्वप्नील तोडकर, युवराज पचकर यांच्या उपस्थितीत ही मदत संविता आश्रमाचे बाबू सावंत यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

15 + fourteen =