You are currently viewing ओबीसी समाज आरक्षणाबाबत अभिनंदनाचा ठराव

ओबीसी समाज आरक्षणाबाबत अभिनंदनाचा ठराव

अध्यक्ष रमण  वायंगणकर यांच्या अध्यक्षतेखाली भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळ वेंगुर्लेची सभा संपन्न

वेंगुर्ले

भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळ वेंगुर्ले या मंडळाची सभा स्वामी प्रसाद कॉम्प्लेक्स वेंगुर्ले येथे अध्यक्ष रमण शंकर वायंगणकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेत ओबीसी समाज आरक्षणाबाबत अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला. तसेच जिल्हा ओबीसी संघटनेने केलेल्या पाठपुराव्याची प्रशंसा करण्यात आली. यावेळी उपाध्यक्ष ॲड. श्याम गोडकर, चंद्रकांत गडेकर, सचिव विकास वैद्य तसेच सुरेश बोवलेकर, जयराम वायंगणकर, दिनेश तांडेल, डॉ. आनंद बांदेकर, दत्ताराम नार्वेकर, चिंतामणी धुरी, ऍड. प्रकाश बोवलेकर, श्री. पेडणेकर, सारिका कळसेकर, सौ. साळगावकर आदी कार्यकारिणी सदस्य पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 + sixteen =