You are currently viewing वैभववाडी भाजपा भटके विमुक्त आघाडीच्या अध्यक्षपदी गंगाराम अडुळकर तर महिला अध्यक्षपदी राधिका शेळके यांची निवड

वैभववाडी भाजपा भटके विमुक्त आघाडीच्या अध्यक्षपदी गंगाराम अडुळकर तर महिला अध्यक्षपदी राधिका शेळके यांची निवड

वैभववाडी भाजपा भटके विमुक्त आघाडीच्या अध्यक्षपदी गंगाराम अडुळकर तर महिला अध्यक्षपदी राधिका शेळके यांची निवड

जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांनी कार्यकारणी केली जाहीर

वैभववाडी

वैभववाडी भाजपा भटके विमुक्त आघाडीच्या अध्यक्षपदी गंगाराम अडुळकर तर महिला अध्यक्षपदी राधिका शेळके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तालुका कार्यकारिणी नुकतीच जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांनी जाहीर केली. भाजप तालुका मंडळ अध्यक्ष नासीर काझी, भाजप भटके विमुक्त आघाडी जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा प्रभारी मारुती मोहिते, सुरेश बोडके, दिपक गजोबार, नगरसेविका सुंदरी निकम, व इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. वैभववाडी तालुक्याचे सुपुत्र संजय राठोड यांची निवड सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस पदी निवड जाहिर करण्यात आली.
वैभववाडी भाजपा भटके विमुक्त आघाडी कार्यकारणी पुढिल प्रमाणे- अध्यक्ष गंगाराम भैरू आडुळकर, उपाध्यक्ष गंगाराम शिंदे, सदानंद शंभुनाथ गोसावी, उपाध्यक्ष राजेश सदाशिव गजोबार, उपाध्यक्ष – बापू उर्फ शामराव धाऊ शेळके, सरचिटणीस रवींद्र गणपत भागवत, संघटक सरचिटणीस प्रकाश झोरे, चिटणीस चंद्रकांत बोडेकर, कु.संतोष गुरखे, चिटणीस बबन खरात, कार्याध्यक्ष खेरू वालू पवार, मनोहर बोडेकर, संपर्कप्रमुख नवलू झोरे, तालुकाप्रमुख सल्लागार-दाजी बर्गे, सल्लागार मधुकर कोकरे, सल्लागार- सदाशिव माने, मीडिया प्रमुख- रुपेश निकम.
भाजपा भटके विमुक्त महिला आघाडी वैभववाडी कार्यकारिणी – तालुका महिला अध्यक्ष- सौ.राधिका शामराव शेळके, उपाध्यक्ष श्रीमती सुंदरी रामचंद्र निकम, सरचिटणीस-रुक्मीणी पांडुरंग शेळके, दिपा दीपक गजोभार.
भाजपा भटके विमुक्त आघाडी वैभववाडी तालुका युवक कार्यकारणी – तालुका युवा अध्यक्ष – कुमार अनिल राजेश कोकरे, सरचिटणीस-निलेश लक्ष्मण शेळके, तर भाजपा भटके विमुक्त आघाडी वैभववाडी शहर अध्यक्षपदी- संतोष बापू निकम यांची निवड करण्यात आली आहे. सर्व पदाधिकारी यांचे नवलराज काळे यांनी आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा