You are currently viewing संवाद मीडियाचा जुगाऱ्यांना दणका…..

संवाद मीडियाचा जुगाऱ्यांना दणका…..

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जुगार दिवाळीपर्यंत बंद ठेवण्याचे एलसीबीचे निर्देश.

कोरोनाच्या महामारीत सर्वच उद्योग बंद पडले, परंतु बेकायदेशीर चालणारे धंदे मात्र जोमात सुरू झाले. दारूची चोरटी वाहतूक, जुगाराच्या बैठका जोरदार झडू लागल्या. संवाद मीडियाने मात्र बेकायदेशीर धंद्यांच्या विरोधात दंड थोपटले. जिल्ह्यात सुरू असणारी दारू वाहतूक असो वा जुगाराची बैठक कुठे आणि किती वाजता बसणार? कोण त्याचा मुख्य सूत्रधार? कुठल्या बैठकीत किती रुपये कमावले? खाकी वर्दीतील कोण माणूस त्यांना पाठबळ देतो? इथपासून संपूर्ण माहिती संवाद मीडिया जाहीरपणे मांडत होता. त्यामुळे जुगाराची बैठक लावणारे सूत्रधार आणि त्यांना पाठिंबा देणारे खाकितील झारीतील शुक्राचार्य यांची तारांबळ उडाली.
संवाद मीडियाने जुगाराच्या बैठकीच्या जागेची इत्यंभूत माहिती दिली की जुगारी जागा बदलून बसण्याचे सत्र गेले काही दिवस सुरूच होते. संवाद मीडियाला इत्यंभूत माहिती कशी काय मिळते? जागेचे लोकेशन कसे मिळते? या शोधातही जुगाऱ्यांचे लोक होते. परंतु संवाद मीडियाने जुगाऱ्यांचा पाठलाग सोडला नाहीच. शेवटी आपले पोलीस खाते बदनाम होत असल्याचे लक्षात येताच जुगाऱ्यांवर नजर ठेवून असणारे पोलिसांचे एलसीबी खाते जागे झाले आणि संवाद मीडियाने उघडलेल्या मोहिमेमुळे तूर्तास दिवाळी पर्यंत जुगाराच्या बैठका बंद ठेवण्याचे निर्देश जुगाऱ्याना देण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × one =