You are currently viewing चीन ने अवकाशात सोडलेलं 21 हजार किलोचं राॅकेट अनियंत्रित….

चीन ने अवकाशात सोडलेलं 21 हजार किलोचं राॅकेट अनियंत्रित….

तुकडे पृथ्वीवर आदळणार…. पण कुठे??

बीजिंग : चीनचे एक मोठं अनियंत्रित रॉकेट The Long March 5B पृथ्वीवर आदळण्याची शक्यता आहे. पण ते नेमकं कधी आणि कोणत्या ठिकाणी आदळणार याची निश्चिती नाही.

अमेरिकेचे संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते माइक हावर्डने सांगितलं की, “चीनेचे रॉकेट The Long March 5B वर अमेरिकेची नजर आहे. अद्याप या रॉकेटने वातावरणात प्रवेश केला नाही. हे रॉकेट ज्यावेळी पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करेल त्यावेळी हे कोणत्या ठिकाणी आदळेल हे निश्चितपणे सांगता येईल.”

पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताना या रॉकेटचा बहुतांशी हिस्सा जळून खाक होणार आहे.

जवळपास 100 फुट लांब असलेले हे रॉकेट चार मैल प्रति सेकंद या वेगाने पृथ्वीकडे प्रवास करत आहे. चीनने गुरुवारी या रॉकेटच्या मदतीने अंतराळात तयार करण्यात येत असलेल्या स्पेस स्टेशनचा पहिला भाग पाठवला होता. चीन तियान्हे नावाचे एक स्पेस स्टेशन अवकाशात उभं करत आहे.

या रॉकेटचे तुकडे नेमके कुठे आदळणार याची माहिती नसल्याने जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. अमेरिका, मेक्सिको, मध्य अमेरिका, दक्षिण अमेरिका, आफ्रिका, भारत, चीन आणि ऑस्ट्रेलिया या देशांत कुठेतरी हे रॉकेट आदळेल अशी शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आली आहे. तसेच जास्तीत जास्त समुद्रात हे रॉकेट पडावे यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen − one =