You are currently viewing निलेश राणे ‌यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना दप्तर व खाऊचे वाटप

निलेश राणे ‌यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना दप्तर व खाऊचे वाटप

निलेश राणे ‌यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना दप्तर व खाऊचे वाटप

मालवण

मा. निलेश राणे मालवण कुडाळ विधानसभा संयोजक यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी मालवण व भाजपा महिला आघाडी तर्फे टोपीवाला हायस्कूल मधील काळेबाईंची बालवाडी यामध्ये व कन्या शाळा येथील बालवाडी सर्व विद्यार्थ्यांना दप्तर व खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी निलेश राणे यांना संस्कृत श्लोक म्हणून शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर ,जिल्हा कार्यकारणी सदस्य गणेश कुशे ,दीपक पाटकर, पंकजा साध्ये ,ललित चव्हाण ,पंकज पेडणेकर ,महेश सारंग, पंकज राणे ,नरेंद्र जामसांडेकर ,महिला तालुकाध्यक्ष पूजा करलकर, ममता वराडकर, महानंदा खानोलकर, दिव्या कोचरेकर, महिमा मयेकर ,वैष्णवी मोंडकर, तारका चव्हाण ,नमिता गावकर व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा