You are currently viewing शिरगाव येथे १९ रोजी मोफत आरोग्य शिबिर

शिरगाव येथे १९ रोजी मोफत आरोग्य शिबिर

शिरगाव येथे १९ रोजी मोफत आरोग्य शिबिर

देवगड

देवगड तालुक्यातील शिरगाव येथे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड पुरस्कृत आणि मुंबई, भांडुप येथील उमंग चाइल्ड ट्रस्टद्वारा आयोजित ३० ते ६० वयोगटातील महिलांसाठी १९ एप्रिल रोजी सकाळी ९:३० ते दुपारी ३:३० या वेळेत शिरगाव हायस्कूल येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरात मधुमेह, थायरॉईड, कंप्लीट ब्लड काऊंट (सीबीसी), हिमोग्लोबिन, व्हिटॅमिन डी ३ तसेच ४० वर्षांवरील महिलांसाठी ब्रेस्ट कॅन्सर (मेमोग्राफी) या तपासण्या मोफत करण्यात येणार आहेत. तपासणी केलेल्या महिलांसाठी पोषण किटचे मोफत वितरणही करण्यात येणार आहे. आरोग्य तपासणी शिबिरात प्रथम येणाऱ्या ३०० महिलांसाठी प्रवेश देण्यात येणार आहे. शिबिरात सहभागी होणाऱ्या महिलांनी येताना आपले आधार कार्ड झेरॉक्स आणणे आवश्यक आहे.
शिबिरात सहभागी होणा-या महिलांनी बुधवार, १७ एप्रिल रोजी सकाळी १०:०० वाजेपर्यंत नावनोंदणीसाठी अमित साटम, धनराज पारधी, महेश शिरोडकर, युधिराज राणे यांच्याशी संपर्क साधावा.

या शिबिराला शिरगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई, राजे ग्रुप शिरगाव, मित्र शिरगाव आणि आर. के. फाउंडेशन या सामाजिक संस्थांचे सौजन्य लाभणार आहे.
या शिबिरात जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हावे, असे आवाहन शिरगाव येथिल विविध सामाजिक संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा