दोडामार्ग तालुक्यात लसीकरणाची जनजागृती आवश्यक

दोडामार्ग तालुक्यात लसीकरणाची जनजागृती आवश्यक

इतर तालुक्यात मोठा प्रतिसाद

दोडामार्ग

देशभर कोरोना प्रादुर्भाव वाढत असताना देशभरात १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींना कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची सुरुवात झाली आहे.मात्र दोडामार्ग तालुक्यात या लसीकरण मोहिमेची म्हणावी तशी जनजागृती झाली नसल्याने या लसीकरणाला अल्प प्रतिसाद मिळत आहे.
कोरोना प्रतिबंधक लसीकरण यापूर्वी ४५ वर्षांवरील व्यक्तींना करण्यात आले. त्यानंतर १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींना लसीकरण करण्याची मोहीम सुरू झाली.३ मे पासून प्रत्यक्ष लसीकरण सुरू झाले आहे. प्रथम रजिस्ट्रेशन करूनच हे लसीकरण करण्यात येत आहे.दोडामार्ग तालुक्यात गेल्या काही दिवसात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर ही लसीकरण मोहीम अतिशय महत्त्वाची आहे.मात्र दोडामार्ग तालुक्यात म्हणावी तशी जनजागृती झाली नाही. त्यामुळे याचा दोडामार्ग तालुक्यातील नागरिकांना याचा फायदा होत नाही.कणकवली,सावंतवाडी आणि गोवा राज्यातील लोकांना या लसीकरणाचा जास्त फायदा होताना दिसत आहे.

पहिल्या दिवशी १०० तर दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत ५० लोकांनी ही लस घेतली आहे. कोरोना काळात एकमेकांवर राजकीय पक्ष पदाधिकारी आरोप प्रत्यारोप करताना दिसतात.मात्र ही लसीकरण मोहीम राबवताना कोणताही राजकीय पक्ष जनजागृती करण्याचा प्रयत्न करताना दिसत नाही हे विशेष. त्यामुळे भविष्यात हा कोरोनाचा विळखा जर तोडायचा असेल तर तालुक्यातील सर्वांना लसीकरण होणे आवश्यक आहे. त्यामुळे लसीकरण जनजागृती मोहीम आतातरी राबवणे गरजेचे आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा