You are currently viewing “स्वच्छतेसाठी श्रमदान” या अभियानाचा वेंगुर्लेत शुभारंभ…

“स्वच्छतेसाठी श्रमदान” या अभियानाचा वेंगुर्लेत शुभारंभ…

वेंगुर्ले

भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त स्वच्छ भारत अभियान टप्पा २ अंतर्गत आज पंचायत समिती वेंगुर्ला येथे स्वच्छता शपथ घेवुन स्वच्छतेसाठी श्रमदान या अभियानाचा शुभारंभ सभापती सौ. अनुश्री कांबळी यांच्यासह सर्वांनी मिळून करण्यात आला.

वेंगुर्ले मधील या कार्यक्रमास सभापती अनुश्री कांबळी यांच्यासह गटविकास अधिकारी उमा पाटील, पशुधन विकास अधिकारी विदयानंद देसाई, एकात्मीक बालविकास अधिकारी श्रीम सामंत, सहा. लेकाधीकारी दिनकर चाटे, विस्तार अधिकारी शिक्षण श्रीम. वंदना परब, विस्तार अधिकारी पंचायत संदेश परब, जि.पा.व.स्व.तज्ञ श्री निलेश मठकर, अधिक्षक योजना संतोष चव्हाण, अधिक्षक आस्थापना श्रीम कोरगावकर, स्वछ भारत मिशन द्रौपदी नाईक, आश्विनी किंनळेकर तसेच सर्व विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या वेळी स्वच्छता शपथ घेण्यात आली व परिसराची स्वच्छता करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × four =