You are currently viewing राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण व वसतिगृह शुल्क मोफत
राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालय

राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण व वसतिगृह शुल्क मोफत

कोविड -19 योध्दा सन्मान शिक्षण योजनेतर्गंत, राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण व वसतिगृह शुल्क मोफत. कोविड-19 योध्दा सन्मान शिक्षण योजनेंतर्गंत, राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालय, आंबव-देवरुख ता. संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी यांनी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर, ठाणे, नवी-मुंबई, मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्यातील हॉस्पिटल, पोलीस दल,नगरपालिका व महानगरपालिका कार्यरत कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना सन 2020 -2021 या शैक्षणिक वर्षासाठी शिक्षण व वसतिगृह शुल्क मोफत केले असून याचा जास्तीत जास्त लाभ विद्यार्थ्यांनी,पालकांनी घ्यावा असे आवाहन, संस्थेचे अध्यक्ष रविंद्र माने यांनी केले आहे.
या योजनेतर्गंत प्रथम व थेट व्दितीय वर्षासाठी अभियांत्रिकी महाविद्यालयात ऑटोमोबाईल, कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकम्युनिकेशन, मेकॅनिकल इंजिनिअरीग आणि पॉलिटेक्निकसाठी ऑटोमोबाईल, कॉम्प्युटर, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकम्युनिकेशन, मेकॅनिकल इंजिनिअरीग या शाखांमध्ये प्रवेश दिला जाईल तसेच प्रथम वर्ष एमबीएसाठी प्रवेश दिला जाईल. अभियांत्रिकी महाविद्यालय व पॉलिटेक्निक यात प्रत्येकी 50 विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत प्रवेश दिला जाईल. प्रथम वर्ष पदवी व एमबीए मध्ये प्रथम प्राधान्याने (first come First serve basis) प्रवेशित पाल्यांनाच ही योजना लागु होईल. थेट व्दितीय वर्ष पदवी व पदविकेसाठी शासनाच्या केंद्रभूत प्रवेश प्रक्रियेमधून प्रवेशित विद्यार्थ्यांना ही योजना लागू हाईल. सदरची शिक्षण योजना अभ्यासक्रमाच्या पूर्ण कालावधीसाठी लागू राहील. प्रवेशावेळी कार्यरत असलेल्या संबंधित विभागाचे शिफारस पत्र यासाठी जोडणे आवश्यक आहे. तरी संबंधित जिल्ह्यातील पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष रविंद्र माने यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

8 − eight =