ठाकर आदिवासी कला आंगण संग्रहालय वर्धापन दिन

ठाकर आदिवासी कला आंगण संग्रहालय वर्धापन दिन

कुडाळ :

पिंगुळी येथे कृषी पर्यटन केंद्र लोककलाकार श्री. परशुराम गंगावणे यांनी स्थापन केलेल्या ठाकर आदिवासी कला आंगण या लोककला संग्रहालयाला दि. ३ मे २०२१ रोजी १५ वर्षे पूर्ण झाली. ठाकर समाजाच्या पारंपारीक लोककलांचे हे सिंधुदूर्ग  जिल्ह्यातील पहिले आदिवासी संग्रहालय आहे.  या लोककला संग्रहालयाचा वर्धापन दिन दि.३ मे २०२१ रोजी ऑनलाईन पद्धतीने यावेळी पार पडला. या वर्षीच संग्रहालयाचे संस्थापक अध्यक्ष श्री. परशुराम गंगावणे यांना भारत सरकारने कला  या क्षेत्रात पद्मश्री पुरस्कार जाहिर केला. ठाकर जमातीच्या लोककला चित्रकथी कळसुत्री बाहुल्या इ. लोककला जतन संवर्धन व प्रसार करण्याचे काम संस्थेच्या माध्यमातुन गेली १५ वर्षे अखंडपणे चालु आहे.

पद्मश्री. श्री परशुराम गंगावणे यांनी स्थापन केलेल्या ठाकर आदिवासी कला आंगण म्युझियम आता कृषी पर्यटन केंद्र म्हणुन आपल्या भेटीस येईल असे यावेळी श्री. गंगावणे यांनी ऑनलाईन बोलताना सांगितले.  TAKA कोकण कल्चर पार्क असे या कृषी पर्यटन केंद्राचे नाव असुन हे कार्यान्वित करण्याचे  काम गेली वर्षभर ठाकर आदिवासी कला आंगण येथे चालु  असल्याचे श्री. गंगावणे यांनी सांगितले. महाराष्ट्र शासनाच्या नविन कृषी पर्यटन धोरणानुसार या कृषी पर्यटन केंद्राची नोंदणी केलेली आहे. यावेळी लोककला प्रचार करताना कोकणातील खाद्य संस्कृती,शेती विषयक अवजारे ,कोकणातील दुर्मिळ होत चाललेली लोकसंस्कृती चे प्रदर्शन, तसेच पारंपारीक शेती विषयक कार्यशाळा,कला कार्यशाळा, शिबिरे, चर्चासत्र ही या कृषी पर्यटन केंद्रात आपणास पहावयास मिळणार आहे. कोरोना आजाराचा प्रादुर्भाव असल्याने औपचारीक उद्घाटन  या कृषी पर्यटन केंद्राचे या वर्धापन दिन कार्यक्रमात करण्यात आले. यावेळी या ऑनलाईन कार्यक्रमात महाराष्ट्र पुणे तसेच गोवा येथुन अनेक  मान्यवरांनी  शुभेच्छा दिल्या तसेच संस्थेच्या या नविन कृषी पर्यटन केंद्रास शुभेच्छा हि दिल्या. या कार्यक्रमात पद्मश्री. श्री. परशुराम विश्राम गंगावणे, श्री. अरुण रणसिंग, चेतन गंगावणे, श्री. शेखर गंगावणे, श्री.दादा मसके,श्री. भरत  ठाकुर ,श्री.सदानंद मसके, श्री. मंगेश मसके, सुंदर मेस्त्री संस्थेचे विश्वस्थ सहभागी झाले  होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा