You are currently viewing आ. वैभव नाईक यांच्या हस्ते वर्दे येथे जलजीवन मिशन योजनेच्या कामाचे भूमिपूजन

आ. वैभव नाईक यांच्या हस्ते वर्दे येथे जलजीवन मिशन योजनेच्या कामाचे भूमिपूजन

*आ. वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून १ कोटी २३ लाख ६७ हजार रु मंजूर*

 

कुडाळ :

 

कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून वर्दे मधील कुंभारवाडी येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नळपाणी योजनेसाठी १ कोटी २३ लाख ६७ हजार रु. मंजूर झाले आहेत. रविवारी या कामाचे भूमिपूजन आ. वैभव नाईक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी आ. वैभव नाईक यांनी वर्दे गावठण मध्ये भेट देऊन ग्रामस्थांसमवेत बैठक घेऊन विकास कामांवर चर्चा केली. ग्रामस्थांची मते जाणून घेत विकास कामे पूर्णत्वास नेण्याची ग्वाही दिली.

याप्रसंगी विभाग संघटक संदीप सावंत,पप्पू पालव,युवासेना विभाग प्रमुख प्रदीप सावंत,बाळा कुंभार,शाखाप्रमुख सुनील सावंत,पोलिस पाटील सागर पालव,युवासेना शाखाप्रमुख संतोष सावंत, दिलीप सावंत, बंड्या सावंत,सौ. काजल सावंत व ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा