You are currently viewing भाजप भटके विमुक्त आघाडी दोडामार्ग तालुका अध्यक्ष पदी सखाराम जंगले तर जिल्हा चिटणीस पदी जानू पाटील यांची निवड

भाजप भटके विमुक्त आघाडी दोडामार्ग तालुका अध्यक्ष पदी सखाराम जंगले तर जिल्हा चिटणीस पदी जानू पाटील यांची निवड

भाजप भटके विमुक्त आघाडी जिल्हा अध्यक्ष नवलराज काळे यांनी केली निवड जाहीर

दोडामार्ग

भाजप भटके विमुक्त आघाडी दोडमार्ग तालुका अध्यक्ष पदी सखाराम जंगले तर जिल्हा चिटणीस पदी जानू पाटील यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड आमदार नितेश राणे आणि जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. सावंतवाडी वेंगुर्ले दोडामार्ग विधान सभा दौऱ्यावर असताना नियुक्ती पत्र प्रदान करत भटके-विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांनी निवडी केल्या जाहीर.
याप्रसंगी बोलताना श्री.जंगले म्हणाले भाजपा वाढीच्या दृष्टीने आम्ही तालुक्यात प्रयत्न करणार आहोत. येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपाला विजय मिळावा हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून पुढील कार्य केले जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
भटके-विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष नवलराज काळे व पदाधिकारी दौऱ्यावर असताना या निवडी जाहीर केल्या.भाजप भटके विमुक्त आघाडी मजबूत करण्याकरता काळे जिल्हा दौरा करीत आहेत. भविष्यात जिल्ह्यात भाजपा मोठी ताकद निर्माण करून देणार असा विश्वास जिल्हा अध्यक्ष काळे यांनी व्यक्त केला.

यावेळी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष नवल राज काळे मालवण तालुका भटके विमुक्त आघाडी अध्यक्ष बाळा गोसावी,भाजप भटके विमुक्त आघाडी धनगर समाज जिल्हा अध्यक्ष दिपक खरात, गणु महानवर, सचिन जंगले, रुपेश जंगले,अजय खरवत,शुभम जंगले अनिकेत खरवत,दत्ताराम बोडेकर,राजन झोरे व समाज बांधव कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा