ॲम्बुलन्स चालवत माजी नगराध्यक्ष योगेश चांदोसकर यांनी रुग्णाचे वाचविले प्राण

ॲम्बुलन्स चालवत माजी नगराध्यक्ष योगेश चांदोसकर यांनी रुग्णाचे वाचविले प्राण

देवगड
देवगड जामसंडे नगरपंचायत कार्यक्षेत्रातील बेलवाडी येथील आजारी व्यक्तीस रुग्णालयात जाण्यासाठी तात्काळ ॲम्बुलन्स ची गरज होती. मात्र देवगड ग्रामीण रुग्णालय येथील आमदार नितेश राणे यांनी दिलेल्या अँबुलन्स वर असलेले चालक कोरोना पॉझिटिव असल्याने त्या रुग्णवाहिकेला चालक नसल्याने गैरसोय निर्माण झाली होती.  तर १०८ ॲम्बुलन्स ग्रामीण भागात गेली होती.

याच दरम्यान देवगड ग्रामीण रुग्णालयात देवगड जामसंडे नगरपंचायत चे माजी नगराध्यक्ष विद्यमान नगरसेवक योगेश चांदोसकर हे आपल्या कुटुंबीयांसमवेत लस घेण्यासाठी गेले होते. यादरम्यान रुग्णवाहिकेला चालक नसल्याचे त्यांच्या निदर्शनास येताच स्वतः माजी नगराध्यक्ष योगेश चांदोसकर यांनी ॲम्बुलन्स चालवत बेलवाडी येथे जाऊन तेथील आजारी असलेल्या पेशंटला ग्रामीण रुग्णालयात घेऊन आले.
स्वतः ॲम्बुलन्स चालवत आजारी व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले या कार्याचं सर्वत्र कौतुक होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा