सिंधुदुर्ग किल्याचा ३५६ वा वर्धापन दिन

सिंधुदुर्ग किल्याचा ३५६ वा वर्धापन दिन

किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समितीतर्फे साजरा

मालवण
प्रतिवर्षाप्रमाणे सिंधुदुर्ग किल्याचा ३५६वा वर्धापन दिन किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समिती तर्फे मोरयाचा धोंडा येथे गणेश पुजा करुन साजरा करण्यात आला. डॉ. रामचंद्र काटकर यांचा हस्ते पुजा करण्यात आली. या वेळी दुग्धअभिषेक करण्यात आला. जय शिवाजी जय भवानी, हर हर महादेव घोषणानी परिसर शिवमय झाला.
यावेळी विजय केनवडेकर, सचिव, सौ. ज्योती तोरसकर उपाध्यक्ष, दत्ताञय नेरकर उपाध्यक्ष, भाऊ सामंत, प्रदिप वेगुर्लेकर, चिंतामणी मयेकर, दिपाली नेरकर, सतिश चांदेरकर, निखिल नेरकर, रजत तोरसकर उपस्थितीत होते. छञपती शिवाजी महाराजानी जानभट अभ्यंकर यांचा कडून पायाभरणी पूजा करुन घेतली होती. जानभट अभ्यंकर यांचा सहाव्या पिडितील किरण आपटे यांनी पौरहित्य केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा