You are currently viewing बांदा येथील तरुण मळगाव घाटात कारमध्ये बेशुद्धावस्थेत…

बांदा येथील तरुण मळगाव घाटात कारमध्ये बेशुद्धावस्थेत…

सावंतवाडी

बांदा येथील तरुण मळगाव घाटात कार मध्ये बेशुद्धा अवस्थेत आढळून आला. हा प्रकार आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडला. अनुप सदानंद महाजन (२९), असे त्याचे नाव आहे. त्याला येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृती चिंताजनक असल्यामुळे अधिक उपचारासाठी गोवा-बांबुळी येथे हलविण्यात आले आहे. याबाबत सावंतवाडी पोलिस निरिक्षक फुलचंद मेंगडे यांनी दुजोरा दिला आहे. त्याला उलट्या होत होत्या, मात्र त्या मागचे कारण कळू शकले नाही. याबाबत तपास करण्यात येणार आहे. त्यासाठी बांदा पोलिस ठाण्याच्या निरिक्षकांना आपण संपर्क साधून कल्पना दिली आहे, असे त्यांनी सांगितलेे. याबाबत सावंतवाडी किंवा बांदा पोलिस ठाण्यात उशिरा पर्यंत काहीच नोंद नव्हती त्यामुळे अधिक माहिती मिळू शकली नाही.

घटनेची अधिक माहिती अशी की, संबंधित युवक येथील मळगाव घाटी परिसरात आपल्या ताब्यातील कार मध्ये अत्यवस्थ आढळून आला होता. दरम्यान याबाबतची माहिती पत्रकार तथा मळेवाड उपसरपंच हेमंत मराठे यांनी पोलिसांना देताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी त्या ठिकाणावरून जाणाऱ्या रुग्णवाहिका चालक हेमंत वागळे यांनी त्याला तात्काळ येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे अधिक उपचारासाठी गोवा-बांबुळी येथे हलविण्यात आले आहे. त्याच्या अत्यवस्थ बनवण्याचे कारण गुलदस्त्यात आहे. तर सावंतवाडी व बांदा पोलिसात याबाबत अद्याप कोणतीही नोंद करण्यात आली नाही. त्यामुळे नेमका प्रकार काय ? हे समजू शकले नाही. मात्र या प्रकरणाचा अधिक तपास केला जाणार आहे, असे श्री. मेंगडे यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा